चीनच्या नागरिकाने स्विकारला शिख धर्म, जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 11:52 AM2019-04-22T11:52:44+5:302019-04-22T11:58:39+5:30

हा फोटो आहे Pat Singh Cheung चा. तो एक चीनचा नागरिक आहे.

Meet pat Singh Cheung the Chinese man who turned into Sikh | चीनच्या नागरिकाने स्विकारला शिख धर्म, जाणून घ्या कारण!

चीनच्या नागरिकाने स्विकारला शिख धर्म, जाणून घ्या कारण!

Next

(Image Credit : CBC.ca)

शिख लोकांचे अनेक फोटो तुम्ही नेहमी बघत असाल. पण या फोटोत तुम्हाला काहीतरी वेगळं दिसत असेल. हा फोटो आहे Pat Singh Cheung चा. तो एक चीनचा नागरिक आहे. त्याने आता शिख धर्म स्विकारला आहे. शिख धर्माची ओळख जगभरात सेवा भावशी संबंधित अशीच आहे. आता एका चीनी नागरिकाने शिख धर्म स्विकारल म्हटल्यावर लोकांना वेगवेगळे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. चला जाणून घेऊ या Pat Singh बद्दल...

(Image Credit : Indiatimes.com)

Pat Singh हा सध्या कॅनडामध्ये राहतो. त्याने सांगितले की, त्याचं शिख धर्म स्विकारण्याचा एकमेव कारण म्हणजे लोकांची सेवा करणं. Pat या धर्माशी जोडला गेल्यानंतर 'गुरुनानक फ्री किचन' संस्थेशी जुळला. ही संस्था दर रविवारी गरीब लहान मुला-मुलींना मोफत जेवण देते. 

(Image Credit : CBC.ca)

Pat Singh आता पडगी सुद्धा बांधतो. तो केस कापत नाही, इतकेच काय तर दाढी सुद्धा कापत नाही. तो रोज सकाळी 3.30 वाजता उठतो. नंतर धावायला जातो, नंतर गुरुद्वाऱ्यात जातो. पूजा-पाठ करतो. व्यवसायाने Pat एक फोटोग्राफर आहे. 

तो सांगतो की, शिख धर्माशी जोडला गेल्यानंतर त्याने लोकांची मदत करणे सुरु केले. लोकांची मदत करणे हीच शिख असण्याची ओळख आहे. 

Web Title: Meet pat Singh Cheung the Chinese man who turned into Sikh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.