खरंच? २३ लाखांना विकला जातोय साधारण दिसरणारा हा कुत्रा; कारण वाचून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 07:44 PM2021-02-05T19:44:56+5:302021-02-05T19:55:42+5:30
शिपडॉग कुत्र्याची अशी प्रजात आहे. जी जास्तीत जास्तवेळ बकऱ्यासह राहते.
(Image Credit-Dewi jenknis)
कुत्रा हा सगळ्यात इमानदार प्राणी म्हणून ओळखला जातो. कुत्र्याच्या वेगवेगळ्या प्रजाती जगभरात पाहायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला एका आगळ्या वेगळ्या कुत्र्याबद्दल सांगणार आहोत. हा सगळ्यात महागडा कुत्रा असून या कुत्र्याचा वापर शेतीसाठी केला जातो. शिपडॉग कुत्र्याची अशी प्रजात आहे. जी जास्तीत जास्तवेळ बकऱ्यासह राहते.
या कुत्र्याला इतर कुत्र्यांच्या तुलनेत केस खूप असतात. अलिकडेच एका वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या कुत्र्याची विक्री करण्यात आली आहे. हा कुत्रा २७ हजार युरो म्हणजेच भारतीय चलनाच्या हिशोबानं पाहिल्यास २३ लाखांपेक्षा जास्त रुपयांना विकला गेला आहे.
बरीच वर्ष सिंगल होता पठ्ठ्या; आता भाडं घेऊन बनतोय बॉयफ्रेंड, भानगड आहे तरी काय?
बीबीसीनं दिलेल्या माहितीनुसार डेवी जेनकिन्स एक शेतकरी आहे. अलिकडेच त्यांनी एक कुत्रा पाळला होता. या कुत्र्याचे नाव किम असून हा कुत्रा बॉर्डर कोली प्रजातीचा होता आणि त्याची विक्री तब्बल २ लाख रुपयांपेक्षा जास्त रुपयांना झाली आहे. हा एका प्रकारचा वर्किंग डॉग आहे. म्हणजेच अनेकजण आपल्या शेतीच्या कामासाठी या डॉगचा वापर करून घेतात. Video : काकांनी बॉल तोंडात टाकताच केला असा चमत्कार; कधीही पाहिली नसेल असली भन्नाट जादू
हा सगळ्यात महागडा शीपडॉग आहे
जेनकिन्सनं सांगितले की, ''एक वर्षाचा होण्याआधीच हा कुत्रा विकला गेला. हा जगातील सगळ्यात महागडा शीपडॉग आहे. किम एक मादी कुत्रा आहे. हा कुत्रा बकरी आणि मेंढ्यांची काळजी घेण्याचं काम करत होता.'' किमच्या जाण्यानं जेनकिन्सनं दुखी आहेत. पण ती चांगल्या लोकांकडे गेल्यामुळे याचा आनंदही त्यांना आहे.