अरे व्वा! विद्यार्थ्याने मास्कपासून तयार केला तीन पायांचा स्टूल; हा अविष्कार पाहून तुम्हीही कराल कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 06:56 PM2020-12-11T18:56:32+5:302020-12-11T19:09:28+5:30
Trending Viral News in Marathi : युज आणि थ्रो मास्कमुळे आकर्षक स्टूल तयार होऊ शकतात. असा विचारही तुम्ही कधी केला नसेल.
कोरोनाकाळात मास्कचा वापर एखाद्या शस्त्राप्रमाणे केला जात आहे. गेल्या ११ महिन्यांपासून मास्कचा वापर जगभरातील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढला. मास्कमुळे निर्माण होणारा कचरा ही एक नवीन समस्या त्यामुळे निर्माण होऊ शकते. युज आणि थ्रो मास्कमुळे आकर्षक स्टूल तयार होऊ शकतात. असा विचारही तुम्ही कधी केला नसेल. Kim Ha-neul नावाच्या एका विद्यार्थाने १५०० मास्कचा वापर करून बसण्यासाठी आकर्षक स्टूल तयार केला आहे. हा मुलगा दक्षिण कोरियातील रहिवासी आहे. कोरोनाकाळात सगळ्यात जास्त वापरात असलेल्या डिस्पोजेबल मास्कचा वापर करून या विद्यार्थ्याने असा अविष्कार तयार केला आहे.
रॉयर्सने दिलेल्या माहितीनुसार सुरूवातीला किमला डिस्पोजेबल मास्कमुळे होत असलेल्या प्रदूषणाबाबत खूप चिंता होती. त्यानंतर त्याने स्वतःच एको फ्रेंडली उपाय शोधून शक्कल लढवली. या मास्कला रिसायकल करून आकर्षक स्टूल तयार केला आहे. प्लास्टीकला रिसायकल करून अनेक गोष्टी तयार करता येऊ शकतात. polypropylene पासून तयार केलेला मास्क रिसायकल करून आपल्याला खूप टिकाऊ साहित्य तयार करता येऊ शकतं.
किम ज्या शाळेत शिकत आहे. त्या ठिकाणी मास्क कलेक्शन बॉक्स लावले होते. हळूहळू १० हजार मास्क या ठिकाणी गोळा झाले. कोरोना व्हायरसचा प्रसार कमी करण्याठी या मास्कना काही दिवस असचं ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर मास्कमधील कचरा दूर केला. उरलेल्या मास्कच्या सामानातून त्याने बसण्यासाठी स्टूल तयार केले. त्याआधी मास्कला ३०० डिग्री सेल्सियसवर वितळवण्यात आलं होतं आणि तीन पायांचा स्टूल तयार केला. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, अन् आता १० रूपयात लोकांना पोटभर जेवण पुरवतोय 'हा' अन्नदाता
सोशल मीडियावर या विद्यार्थ्याने तयार केलेल्या स्टूलचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. किमला अशी अशा आहे की, या मास्क्सचा वापर करून अजून चांगले टेबल किंवा खुर्च्या तयार केल्या जाऊ शकतात. आता किमने सरकारी तसंच प्रायव्हेट कंपन्यांकडे मास्क जमा करण्यासाठी निवेदन दिलं आहे. आतापर्यंत या स्टूलचीची विक्री सुरू करण्यात आलेली नाही. Video : कमाल! कात्री, कंगवा घेतला अन् स्वतःच न्हावी बनला, अशी केली जबरदस्त हेअरस्टाईल