भारीच! समोर आले जगातील सगळ्यात वयस्कर कासवाचे फोटो, पाहा १८८ वर्षांचा कासव

By Manali.bagul | Published: December 3, 2020 01:35 PM2020-12-03T13:35:55+5:302020-12-03T13:56:43+5:30

Viral News in Marathi : या कासवाचे नाव जोनाथन असून वय  १८८ वर्ष आहे.

Meet the tortoise who is the most aged animals in the planet news | भारीच! समोर आले जगातील सगळ्यात वयस्कर कासवाचे फोटो, पाहा १८८ वर्षांचा कासव

भारीच! समोर आले जगातील सगळ्यात वयस्कर कासवाचे फोटो, पाहा १८८ वर्षांचा कासव

googlenewsNext

कासवाचे आयुष्य सगळ्यात जास्त असते. याची  तुम्हाला कल्पना असेलच. आज आम्ही तुम्हाला जगातील सगळ्यात वयस्कर  कासवाबद्दल सांगणार आहोत. असा कासव याआधी तुम्ही कधीही पाहिला नसेल. या कासवाचे वय ३०० वर्ष नाही. पण या कासवाचे फोटो पाहून तुम्हीही चकीत व्हाल. या कासवाचे नाव जोनाथन असून वय  १८८ वर्ष आहे. आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनी हा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

१८३२ मध्ये या कासवाचा जन्म झाल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत या कासवाने दोन्ही महायुद्ध पाहिली आहेत. रशियाची क्रांतीसुद्धा या कासवाने पाहिली आहे.  दक्षिण अटलांटिक महासागरात ब्रिटेनच्या सेंट हेलेना टापू येथे वास्तव्यास असलेल्या या कासवाचे वय लंडनच्या क्लॉक टॉवर बिग बेन आणि पॅरिसच्या आयफिल टॉवरपेक्षा जास्त आहे.

वैज्ञानिकांना सुद्धा या कासवाच्या वयाबाबत माहिती मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली, पण अजूनही पूर्ण माहिती मिळालेली नाही. म्यूटेशनमुळे पेशींची वाढ झाल्याने कासवांना कॅन्सरचा आजार होतो. जर या आजाराबाबत योग्यवेळी माहिती मिळाली तर कॅन्सरची वाढ होण्यापासून रोखता येऊ शकतं. या कासवाचे नाव गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. 

समुद्रकिनारी सापडला तब्बल १०० किलोंचा दुर्मिळ कासव

तामिळनाडूमधील रामेश्वरच्या समुद्र किनारी एक प्रचंड मोठा कासव आढळून आला आहे. रामनाथपूरम  जिल्ह्यातील मंडपम येथे १०० किलोंचा कासव सापडला होता. समुद्रकिनारी हा कासव  सापडला होता. अनेकदा प्रयत्न करूनही कासव समुद्रात परत जाऊ शकत नव्हता. त्यानंतर रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आणि कासवाला पुन्हा समुद्रात पाठवण्यसाठी प्रयत्न करण्यात आले होते. काय सांगता राव! पोरीने ऑनलाईन जेवण मागवलं, ४२ डिलिव्हरी बॉईज जेवण घेऊन पोहोचले, मग....

विशेषकरून ज्या कासवांचे वजन १०० पेक्षा जास्त किंवा १०० किलोपर्यंत असते अशा कासवांना परत समुद्रात पाठवण्यासाठी प्रयत्न केले  जातात. वजन पाहून या कासवांच्या वयाचा अंदाज लावला जाऊ शकतो. वृत्तसंस्था एएनआयने ट्विट करत या घटनेबाबत माहिती दिली होती. लस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटच्या आदर पुनावालांचे भव्य घर पाहिलेत का? पाहा झक्कास फोटो

Web Title: Meet the tortoise who is the most aged animals in the planet news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.