अरे देवा! ही महिला बॅगेत घेऊन फिरते तिचं 'हृदय', पण असं का ते वाचा.....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 12:30 PM2021-04-16T12:30:08+5:302021-04-16T12:32:27+5:30
ही महिला ब्रिटनमध्ये राहणारी असून तिचं नाव सल्वा हुसैन आहे. तिचं ३९ वर्षे आहे. सल्वाचं हृदय तिच्या छातीत नाही तर ती सोबत ठेवत असलेल्या बॅगेत आहे.
प्रत्येकाचं हृदय हे छातीत धडधडतं. श्वास त्यानेच सुरू राहतो. जर हृदय बंद पडलं तर जीवन संपतं. मात्र, एक अशी महिला आहे जिचं हृदय तिच्या शरीरात नाहीच. तिचं हृदय तिच्या पाठीवरील बॅगेत आहेत. ती सोबत ठेवत असलेल्या बॅगेतं तिचं हृदय आहे. हे ऐकायला भलेही अजब वाटत असेल, पण खरं आहे. ही महिला ब्रिटनमध्ये राहणारी असून तिचं नाव सल्वा हुसैन आहे. तिचं ३९ वर्षे आहे. सल्वाचं हृदय तिच्या छातीत नाही तर ती सोबत ठेवत असलेल्या बॅगेत आहे.
काय झालं होतं?
सल्वा यांचं लग्न झालं आहे. आणि त्या दोन मुलांच्या आई आहेत. जुलै २०१७ ची घटना आहे. सगळं काही ठीक सुरू होतं. अचानक एक दिवस त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यांना लगेच स्थानिक हॉस्पिटलमद्ये दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना हृदयाचा गंभीर आजार आहे.
आर्टिफिशिअल हृदय
डॉक्टरांनी सल्वा यांच्या सर्व टेस्ट केल्या. त्यानंतर असं लक्षात आलं की, ते सल्वा यांना हार्ट ट्रान्सप्लांट करू शकत नाही. अशात एक आर्टिफिशिअल हृदय लावणं हाच एक मार्ग होता. यासाठी सेल्वा यांच्या पतीने डॉक्टरांना परवानगी दिली.
त्यानंतर डॉक्टरांनी तिचं हृदय काढून त्याजागी एक कृत्रिम प्रत्यारोपण करून त्यांच्या पाठीवर स्पेशल यूनिट लावलं.
त्यासोबतच एका बॅकमध्ये बॅटरी, एक इलेक्ट्रीक मोटार आणि एक पंप ठेवलं गेलं. या बॅगशी दोन प्लास्टिक ट्यूब जोडल्या आहेत. जे त्यांच्या नाभितून फुप्फुसांपर्यंत पोहोचतात. या ट्यूबच्या माध्यमातूनच छातीत प्लास्टिकच्या चेंबरपर्यंत हवा पोहोचवली जाते. ज्याद्वारे संपूर्ण शरीरात ब्लड सर्कुलेशन होतं.
नेहमी एक व्यक्ती सोबत लागते
आता मोटारला सतत पॉवर देण्यासाठी सल्वा यांच्या बॅगपॅकमध्ये बॅटरीचे दोन सेट असतात. एक दुसरं यूनिट स्टॅंडबायच्या मोडवर असतं. जेणेकरून पहिलं फेल झालं तर लगेच दुसरं वापरलं जाईल. यासाठी नेहमी त्यांच्यासोबत कुणीतरी असावं लागतं. त्यांना एकटं सोडणं धोक्याचं आहे.
इतकं दु:खं तरी चेहऱ्यावर हसू
सल्वा यांना सतत याची भीती असते की, बॅटरी बंद पडू नये. इतक्या अडचणी असूनही सल्वा यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असतं. सल्वा या इतर लोकांसाठी एक उदाहरण आहेत. खासकरून अशा लोकांसाठी जे दु:खात हार मानतात.