इथे लोकांना दुसरं लग्न करणं बंधनकारक, केलं नाही तर मिळते शिक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 01:35 PM2024-03-08T13:35:34+5:302024-03-08T13:37:39+5:30

जर एखाद्या पुरूषाने दोन लग्न करण्यास नकार दिला तर त्यांना कठोर शिक्षा भोगावी लागते.

Men have rights to marry two women if refuses then gets life imprisonment | इथे लोकांना दुसरं लग्न करणं बंधनकारक, केलं नाही तर मिळते शिक्षा!

इथे लोकांना दुसरं लग्न करणं बंधनकारक, केलं नाही तर मिळते शिक्षा!

आपल्या देशात सामान्यपणे असा नियम आहे की, एक पत्नी असताना दुसरं लग्न करू शकत नाही. पण याबाबत जगातील वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळे नियम आहेत. पण अनेकांना हे माहीत नसेल जगात एक असाही देश आहे जिथे प्रत्येक पुरूषाला दोन लग्न करणं अनिवार्य आहे. जर एखाद्या पुरूषाने दोन लग्न करण्यास नकार दिला तर त्यांना कठोर शिक्षा भोगावी लागते.

आफ्रिका महद्वीपाच्या देशांमध्ये लग्नाबाबत वेगवेगळे कायदे आहेत. पण हे कायदे दुसऱ्या कोणत्याच देशात नाहीत. आफ्रिकेच्या एका देशात अजब कायदे आहेत. इथे पुरूषांना दोन करणं बंधनकारक आहे. जर एखाद्या व्यक्तीने दोन लग्न करण्यास नकार दिला तर त्याला कठोर शिक्षा दिली जाते. 

आफ्रिकेच्या या देशात दोन लग्न करण्याचा अनोखा कायदा तयार करण्यात आला आहे. या आफ्रिकी देशाचं नाव आहे इरीट्रिया. इथे पुरूषांना दोन लग्न करणं अनिवार्य आहे. मग ते आनंदाने करा किंवा दु:खी मनाने.

इरिट्रिया देशात दोन लग्न करणं बंधनकारक आहे. जर कुणी दोन लग्न करण्यास नकार दिला किंवा दोन पत्नी ठेवण्यास नकार दिला तर त्या व्यक्ती विरोधात कठोर कारवाई केली जाते. या व्यक्तीला आयुष्यभर तुरूंगातही रहावं लागू शकतं. या देशात महिलांमुळे हा कायदा बनवण्यात आला आहे. इरिट्रिया देशात पुरूषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. इरीट्रियाचं इथियोपियासोबत गृहयुद्ध सुरू आहे. ज्यामुळे इथे महिलांची संख्या जास्त आहे.

सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे या देशात महिलांसाठीही कठोर कायदे आहेत. इथे महिला पतीला दोन लग्न करण्यापासून रोखूही शकत नाही. जर त्यांनी पतीच्या दुसऱ्या लग्नावर आक्षेप घेतला  तर त्यांनाही तुरूंगात टाकलं जातं.

Web Title: Men have rights to marry two women if refuses then gets life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.