भारतातील एक असं गाव जिथे पत्नी प्रेग्नेंट होताच पती करतो दुसरं लग्न, कुणीच करत नाही विरोध...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 03:01 PM2022-06-17T15:01:56+5:302022-06-17T15:02:11+5:30
Husband Remarry After Wife Is Pregnant : सात जन्म एकमेकांची साथ निभावण्याची शपथ घेणारा पती पत्नी प्रेग्नेंट झाली की, लगेच दुसरं लग्न करतो. तरीही पत्नी किंवा समाज त्यांना काही म्हणत नाही. याचं एक खास कारण म्हणजे पाणी.
Husband Remarry After Wife Is Pregnant : मनुष्याच्या आयुष्यात लग्नाचा कार्यक्रम फार महत्वाचा असतो. लग्नाचं बंधन हे पवित्र मानलं जातं. खासकरून हिंदू लोकांमध्ये लग्नाला फार महत्व असतं. भारतात कायद्यानुसार हिंदू धर्मानुसार एक लग्न करण्याची परवानगी आहे. पण भारतातील एका राज्यात एक असाही भाग आहे जिथे पुरूष आरामात दुसरं लग्न करतात. पुरूष हे दुसरं लग्न तेव्हा करतात जेव्हा त्यांची पत्नी प्रेग्नेंट असते. आश्चर्याची बाब म्हणजे गर्भवती पत्नीही पतीला हे लग्न करण्यासाठी परवानगी देते.
सात जन्म एकमेकांची साथ निभावण्याची शपथ घेणारा पती पत्नी प्रेग्नेंट झाली की, लगेच दुसरं लग्न करतो. तरीही पत्नी किंवा समाज त्यांना काही म्हणत नाही. याचं एक खास कारण म्हणजे पाणी. पाणी हेच कारण आहे ज्यामुळे गर्भवती पत्नीही आनंदाने पतीचं दुसरं लग्न लावून देते. आता तुम्ही म्हणाल की, हे कोणतं कारण आहे? चला तर जाणून घेऊ एका अशा गावाबाबत जिथे केवळ आणि केवळ पाण्यासाठी एक गर्भवती पत्नी पतीचं दुसरं लग्न लावून देते.
हा अजब रिवाज आहे राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील. येथील देरासर गावात वर्षानुवर्षे ही अजब परंपरा सुरू आहे.
जेव्हाही या गावात एखाद्या व्यक्तीची पत्नी प्रेग्नेंट राहते तेव्हा तिचा पती लगेच दुसरं लग्न करतो. या लग्नावर त्याच्या पत्नीला किंवा गावातील कुणालाही आक्षेप नसतो. कारण असं आहे की, या गावात किंवा आजूबाजूला पाण्याची मोठी समस्या आहे. अशात महिला दूरदूर जाऊन पाणी आणतात. पण महिला जेव्हा प्रेग्नेंट होतात तेव्हा पाणी आणू शकत नाहीत. अशात पती पाण्यासाठी दुसरं लग्न करतो.
या भागात पाण्याची मोठी समस्या आहे. पुरूष तर घरातील काम करत नाहीत. अशात महिलाच चेहरा झाकून दूरदूर पाणी भरण्यासाठी जातात. पण जेव्हा घरातील महिला गर्भवती होते तेव्हा तिला भरणं अवघड होतं. अशात महिलेचा पती दुसरं लग्न करतो. जेणेकरून घरात पाणी आणता यावं. गर्भवती महिला घरातील काम करते आणि दुसरी महिला पाणी भरायला जाते. या लग्नावरून पहिल्या पत्नीला कोणतीही समस्या नसते.