म्हणून पुरुष करतात उघड्यावर लघुशंका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2018 02:20 PM2018-06-03T14:20:40+5:302018-06-03T14:20:40+5:30
सार्वजनिक ठिकाणी फिरताना तुम्ही अनेक पुरुषांना कुठे आडोशाला तर कुठे उघड्यावरच लघुशंका करताना सर्रास पाहिले असेल.
बर्लिन - सार्वजनिक ठिकाणी फिरताना तुम्ही अनेक पुरुषांना कुठे आडोशाला तर कुठे उघड्यावरच लघुशंका करताना सर्रास पाहिले असेल. पण सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करण्याची पुरुषांची ही सवय केवळ भारतातीलच समस्या आहे, असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. जर्मनीमधील प्रशासनही पुरुषांच्या या सवयीमुळे त्रस्त झाले आहेत. दरम्यान, जर्मनीतल्या संशोधकांनी उघड्यावर लघुशंका करण्याच्या पुरुषांच्या या सवयीमागचे कारण शोधून काढले आहे.
जर्मनीमध्ये फुटबॉल स्टेडियमजवळ पुरुषांकडून मोठ्या प्रमाणावर लघुशंका केली जाते. स्टेडियम आणि मेट्रो स्थानकांमध्ये प्रसाधन गृहांमधील अंतर लांब असणे हे त्यामागचे प्रमुख कारण मानले जात आहे. तसेच उघड्यावर लघुशंका केल्याने वास पसरत असल्याने पुरुष मंडळी आडोशाला जाऊन झाडांच्या मुळाशी लघुशंका करतात. असे करून आपण काहीतरी चांगले काम करतो आहोत असे त्यांना वाटते. तसेच संशोधकांनी व्यावहारिक कारणे सोडून पुरुषांनी असे करण्याची इतर कारणे शोधून काढली आहेत. त्यानुसार नशेमध्ये असणारे पुरुष उघड्यावर लघुशंका करतात कारण त्यामुळे सोशल बाँडिंग वाढते. धक्कादायक बाब म्हणजे उघड्यावर भिंत किंवा वृक्षांच्या आडोशाला लघुशंका करताना येणारा मोठा आवाज पुरुषांना आवडतो, म्हणून अनेकजण उघड्यावर लघुशंका करतात. ही बाब विचारात घेऊन संशोधकांना सार्वजनिक ठिकाणी पी बेड बनवण्याची योजना आखली आहे. ज्यामुळे गल्ल्या आणि भिंती लघवीच्या उग्र वासाने भरणार नाहीत. हे बेड्स अंडरग्राऊंड स्टोरेज टँकशी जोडलेले असतील.