काय सांगता! 'या' गावातील विधवा 'स्त्री'च्या भीतीने पुरुष लावत आहेत नेल पॉलिश!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 01:13 PM2018-10-06T13:13:50+5:302018-10-06T13:18:55+5:30
नुकताच अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर या जोडीचा 'स्त्री' हा सिनेमा आलाय. या सिनेमातील एका गावातील लोक एका महिलेच्या आत्म्याच्या भीतीने घरांच्या भींतीवर लिहितात की, 'ओ स्त्री कल आना'.
नुकताच अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर या जोडीचा 'स्त्री' हा सिनेमा आलाय. या सिनेमातील एका गावातील लोक एका महिलेच्या आत्म्याच्या भीतीने घरांच्या भींतीवर लिहितात की, 'ओ स्त्री कल आना'. इतकेच नाही तर गावातील पुरुषांनी तिच्या भीतीमुळे महिलांचे कपडे वापरणे सुरु केले होते. अर्थातच हा एक काल्पनिक सिनेमा आहे, पण थायलंडमधील एका गावात असंच काहीसं चित्र बघायला मिळत आहे.
थायलंडच्या पु-हॉन्ग या गावातील ही घटना असून गावातील लोकांचं म्हणनं आहे की, एका महिलेची आत्मा त्यांना त्रास देत आहे. त्यामुळे परिस्थिती अशी झाली आहे की, गावातील पुरुष नेल पॉलिश लावत आहेत. इतकेच नाही तर घराबाहेर भींतीवर 'इथे कुणीही पुरुष राहत नाहीत' असे लिहिले जात आहे. हे सगळं गेल्या काही दिवसात गावात झालेल्या मृत्यूंनंतर सुरु झालं.
असे सांगितले जात आहे की, पु-हॉन्गमध्ये गेल्या तीन आठवड्यात पाच लोकांचा मृत्यू झालाय. सर्वातआधी एकाच परिवारातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. दोघेही व्यवस्थित होते, पण केवळ पडले आणि त्यांच्या हृदयाचे ठोके बंद झाले. त्यानंतर एका दुचाकी अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला. दोन इतरही मृत्यू अचानकच झालेत. याबाबत गावातील लोक काही बोलतही नाहीत. गावातील लोकांची अशी अंधश्रद्धा आहे की, हे सगळं त्या महिलेच्या आत्म्यामुळे झालंय.
गावातील एका ६० वर्षीय महिलेने स्थानिक वृत्तपत्राला सांगितले की, 'मला पूर्ण विश्वास आहे की, गावात या घटना दोन प्रेत आत्म्यांमुळे होता आहेत. यातील एक आत्मा ही विधवा महिलेची आहे. ती पुरुषांना त्रास देत आहे. तर दुसरी आत्मा ही पोपची आहे जी वयोवृद्धांना त्रास देत आहे'.
(स्त्री सिनेमातील छायाचित्र)
गावातील लोकांमध्ये कथित विधवेच्या आत्म्याने जास्त भीतीदायक वातावरण आहे. गावात ही अफवा पसरली आहे की, विधवा महिलेची आत्मा पुरुषांना टारगेट करत आहे. त्यामुळे सर्व पुरुष घाबरलेले आहेत. अशात गावातील काही पुरुषांनी यावर काही उपाय शोधले आहेत. जे 'स्त्री' सिनेमाप्रमाणेच आहेत. गावातील पुरुष नेल पॉलिश लावत आहेत. इतकेच नाही तर घराबाहेरील भींतीवर 'या घरात पुरुष राहत नाही' असे लिहिले जात आहे. असे करण्यामागे गावकऱ्यांची धारणा आहे की, ती कथित आत्मा अशाने ते घर सोडून पुढे निघून जाते. काही लोक गाव सोडूनही गेले आहेत.