युद्धाचं साहित्य शोधत होते लोक, अचानक सापडला सोन्याचा खजिना आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 01:44 PM2023-11-11T13:44:15+5:302023-11-11T13:45:06+5:30

तीन मेटल डिटेक्टरिस्ट्सची एक टीम जंगलात द्वितीय महायुद्धादरम्यान शिल्लक राहिलेल्या अवशेषांचा ते शोध घेत होते.

Metal Detectors find a mysterious treasure trove of gold coins in a forest in Poland Facebook viral post | युद्धाचं साहित्य शोधत होते लोक, अचानक सापडला सोन्याचा खजिना आणि मग...

युद्धाचं साहित्य शोधत होते लोक, अचानक सापडला सोन्याचा खजिना आणि मग...

पोलॅंडच्या एका जंगलात सोन्याच्या नाण्यांचा रहस्यमय खजिना सापडला आहे. हा खजिना तेव्हा सापडला जेव्हा तीन मेटल डिटेक्टरिस्ट्सची एक टीम जंगलात द्वितीय महायुद्धादरम्यान शिल्लक राहिलेल्या अवशेषांचा ते शोध घेत होते. त्याऐवजी त्यांना सोन्याच्या नाण्यांचा एक खजिना सापडला. ज्यात सोन्याची खूपसारी नाणी होती. जी बघून ते अवाक् झालेत.

मियामी हेराल्डच्या रिपोर्टनुसार, स्जेसकिन एक्सप्लोरेशन ग्रुप एसोसिएशनचे लुकाज इस्टेल्स्की आणि इतर दोन लोकांनी स्ज़ेसकिन (Szczecin) जवळ एका जंगल भागात मेटल डिटेक्टरच्या मदतीने हा खजिना शोधला. इस्टेल्स्कीने 7 नोव्हेंबरला पोलिश प्रेस एजेंसीला याबाबत सांगितलं. 

इस्टेल्स्कीने आपल्या मित्राला काहीतरी शोधल्यावर ओरडताना पाहिलं आणि जेव्हा ते तिथे गेले तेव्हा त्यांना दिसलं की, जमिनीत जवळपास 6 ते 8 इंच खाली एक धातुचा डबा आहे. त्यांनी पुढे सांगितलं की, धातुचा डबा सहजपणे तुटला आणि मग त्यातून अनेक नाणी बाहेर पडल्या.

स्ज़ेसिन एक्सप्लोरेशन ग्रुप एसोसिएशनने 5 नोव्हेंबरला खजिना मिळाल्याबाबत फेसबुकवर पोस्ट केली होती. सोबतच सोन्याच्या नाण्यांचा फोटोही शेअर केला होता. ज्यात बघू शकता की, सोन्याची नाणी कशी आहेत. नाणी चमकदार दिसत आहेत. 
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, खजिन्यात 70 सोन्याची नाणी आहेत.

एका फोटोत सोन्याची नाणी ठेवलेली दिसत आहेत. फेसबुक पोस्टमध्ये सांगण्यात आलं की, कॅशचं वजन जवळपास 14 औंस आणि यात 5 डॉलर, 10 डॉलर आणि 20 डॉलरच्या नाण्यांसोबत 5 आणि 15 रूबलची नाणी होती. अमेरिकन गोल्ड एक्सचेंजनुसार, 1933 च्या आधीची ही नाणी फार दुर्मीळ आहेत.

Web Title: Metal Detectors find a mysterious treasure trove of gold coins in a forest in Poland Facebook viral post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.