एका व्हिडीओमुळेे १४ वर्ष तुरूंगाची खावी लागणार हवा, ९० लाख व्ह्यूजनंतर यूट्यूबरची झाली ही अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 12:10 PM2021-07-10T12:10:31+5:302021-07-10T12:11:10+5:30

मॅक्सिकोच्या एका यूट्यूबरसोबत हेच झालं. यूट्यूबर तरूणीने एका वादग्रस्त व्हिडीओ शेअर केला आणि तिला तुरूंवास झाला.

Mexico youtuber Yoss Hoffman sentenced imprisonment for sharing child rape video | एका व्हिडीओमुळेे १४ वर्ष तुरूंगाची खावी लागणार हवा, ९० लाख व्ह्यूजनंतर यूट्यूबरची झाली ही अवस्था

एका व्हिडीओमुळेे १४ वर्ष तुरूंगाची खावी लागणार हवा, ९० लाख व्ह्यूजनंतर यूट्यूबरची झाली ही अवस्था

googlenewsNext

सोशल मीडियावर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आजकाल कंटेन्ट क्रिएटर्स आपल्या अकाऊंटवर काहीही शेअर करत असतात. थोड्या लाईक्स, कमेंट्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्ससाठी लोक वादग्रस्त कंटेंटही पोस्ट करतात. मात्र, प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या काही लिमिटेशन असतात आणि त्यांचे नियम तोडल्यावर शिक्षाही होऊ शकते. मॅक्सिकोच्या एका यूट्यूबरसोबत हेच झालं. यूट्यूबर तरूणीने एका वादग्रस्त व्हिडीओ शेअर केला आणि तिला तुरूंवास झाला.

मेक्सिको (Mexico) मधील लोकप्रिय यूट्यूबर योस हॉफमन (Yoss Hoffman) चं योसस्टोप (YosStop) नावाने यूट्यूब चॅनल (YouTube Channel) आहे. त्यावर तिचे ९० लाख फॉलोअर्स आहेत. नुकसाच तिने एक चाइल्ड पोर्नोग्राफी कंटेंट पोस्ट केल्याने तिला तुरूंगवासाची शिक्षा झाली आहे. योस हॉफमनने आपल्या चॅनलवर एक १६ वर्षीय मुलीचा रेपचा व्हिडीओ शेअर केला होता.

यूट्यूब चॅनलवर अशा प्रकारचा कंटेंट शेअर करण्यास मनाई आहे. हा चाइल्ड रेपचा व्हिडीओ २०१८ सालातील आहे आणि योसवर आरोप आहे की, तिने पीडितेला बदनाम करण्यासाठी हा व्हिडीओ शेअर केला. अशात आता योसला अटक करून तिच्यावर केस चालवली जाणार आहे. चाइल्ड पोर्नोग्राफीचा आरोप सिद्ध झाला तर १४ वर्षांच्या शिक्षेचं प्रावधान आहे.

योस हॉफमनला न्यायाची आशा आहे. ती म्हणाली की, केवळ व्हिडीओ पोस्ट केल्याने ती गुन्हेगार होत नाही. मात्र, यूट्यूब आपल्या पॉलिसीबाबत फार कठोर आहे आणि अशात योसचं वाचणं अवघड आहे.
 

Web Title: Mexico youtuber Yoss Hoffman sentenced imprisonment for sharing child rape video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.