11 कोटी रूपयांचे शूज, खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड; पण इतके महाग का?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 09:35 AM2023-06-23T09:35:04+5:302023-06-23T09:37:42+5:30
Michael Jordan Shoes: फ्लूसारखी लक्षण असूनही आणि व्यवस्थित उभा राहू शकत नसूनही त्याने हा कारनामा केला होता. त्यामुळे त्याचं या मॅचमधील प्रदर्शन फार महत्वाचं ठरतं.
Michael Jordan Shoes: प्रसिद्ध बास्केट बॉल खेळाडू मायकल जॉर्डनचे प्रसिद्ध 'फ्लू गेम' मधील शूज एका लिलावात 1.38 मिलियन डॉलर म्हणजे 11 कोटी रूपयांना विकण्यात आले. 1997 मध्ये एनबीए फायनल शिकागो बुल्स आणि यूटा जॅज यांच्यात खेळण्यात आलं होतं. दोन्ही टिमचे 2-2 पॉइंट होते. मायकलचे हे शूज फारच किंमती आहेत कारण त्याने या मॅचमध्ये विजयी शॉट मारला होता. त्याशिवाय बास्केट बॉलच्या या दिग्गजाने 38 पॉइंट बनवले होते, ज्यात 25 सेकंद शिल्लक असताना गो-फॉरवर्ड थ्री-पॉइंटरचाही समावेश आहे.
या 38 पॉइंटमधील 15 पॉइंट चौथ्या क्वार्टरमध्ये बनवले होते. सोबतच असंही सांगितलं जातं की, फ्लूसारखी लक्षण असूनही आणि व्यवस्थित उभा राहू शकत नसूनही त्याने हा कारनामा केला होता. त्यामुळे त्याचं या मॅचमधील प्रदर्शन फार महत्वाचं ठरतं. आजही ही मॅच लोकांच्या स्मरणात आहे.
ही मॅच मायकल जॉर्डनच्या शानदार करिअरमधील सर्वश्रेष्ठ मॅच मानली जाते. बास्केट बॉलच्या या दिग्गजाने शूजची एक जोडी यूटा जॅजचा बॉल बॉय प्रेस्टन ट्रूमॅन याला दिली होती.
1997 चं एनबीए फायनल संपल्यावर मायकलने खूश होऊन बॉल बॉयला त्याचे हस्ताक्षर असलेले स्नीकर्स भेट म्हणून दिले होते. ट्रूमॅनने खेळ सुरू होण्याआधी नियमितपणे अॅप्पल सॉस आणून मायकलला प्रभावित केलं होतं. गोल्डिनच्या वेबसाइटनुसार, ट्रूमॅनने 15 वर्षानंतर आपल्या या अमूल्य संपत्तीचा लिलाव करण्याचा ठरवलं. त्याने या शूजचा लिलाव केला. ज्यांना इतकी मोठी म्हणजे 11 कोटी रूपये इतकी किंमत मिळाली.