घर नव्हे हे आहे टॉयलेट, सिंहासनासारखी आहे कमोडवर बसण्याची जागा...किंमत वाचून झोप उडेल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 04:26 PM2022-03-17T16:26:52+5:302022-03-17T17:00:32+5:30

सध्या अमेरिकेतील मिशिगनमधील एका घरातील आलिशान बाथरुमचा (Bathroom) फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांमध्ये या बाथरुमच्या फोटोची चर्चा पाहायला मिळत आहे.

Michigan royal house has 979000 dollars toilet that looks like king throne | घर नव्हे हे आहे टॉयलेट, सिंहासनासारखी आहे कमोडवर बसण्याची जागा...किंमत वाचून झोप उडेल

घर नव्हे हे आहे टॉयलेट, सिंहासनासारखी आहे कमोडवर बसण्याची जागा...किंमत वाचून झोप उडेल

Next

असं म्हणतात की एकवेळ घर विकत घेणं सोपं आहे, पण ते नीटनेटकं दिसावं यासाठी ते सजवणं खूप कठीण आहे. अनेकांना घर सजवण्याची खूप आवड असते. आजकाल तर घर युनिक वस्तूंनी सजवणं हा एक ट्रेंड झाला आहे. अनेक जण आपली क्रिएटिव्हिटी (Creativity) वापरून घर इतकं भन्नाट सजवतात, पाहणारा माणूस चकित होतो. सध्या अमेरिकेतील मिशिगनमधील एका घरातील आलिशान बाथरुमचा (Bathroom) फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांमध्ये या बाथरुमच्या फोटोची चर्चा पाहायला मिळत आहे.

या फोटोमध्ये दिसतंय की, घरात टॉयलेटच्या (toilet) जागी सिंहासनासारखी लाकडी खुर्ची बसवण्यात आली आहे. म्हणजे या टॉयलेटचा आकार तसा आहे. टॉयलेट अशा पद्धतीनं बनवण्यात आलंय की ते सिंहासनासारखं दिसतंय. हे घर Zillow या अमेरिकन ऑनलाइन रिअल-इस्टेट मार्केटप्लेस कंपनीवर लिस्ट करण्यात आलंय. या लिस्टमधील फोटो पाहिल्यावर त्यामध्ये बाथरुमचा हा फोटो आढळला आणि तो व्हायरल झाला. या घरातील केवळ बाथरुमच नाही, तर घरातील इतर विविध प्रकारच्या वस्तू आणि खोल्यांचेही अनेक फोटो आहेत. एका रिपोर्टनुसार, या घराला ‘हाऊस ऑफ चार्म’ (House of Charm) असंही म्हटलं जातं. लाईव्ह हिंदूस्थानने या संदर्भात वृत्त दिलंय.

या ठिकाणाचं नाव एडिथ फर्न मेलरोस यांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. त्या एक टीव्ही आणि रेडिओ होस्ट होत्या, ज्यांना ‘द लेडी ऑफ चार्म शो’मुळे लोकप्रियता मिळाली होती. या घरात एकूण पाच बाथरुम आहेत, पण सिंहासनासारखी रचना असलेले हे टॉयलेट फक्त एकाच बाथरुममध्ये आहे. फोटोमध्ये असे दिसतंय की सीटच्या मागे एक लाकडी भाग आहे, ज्यावर माणूस बसू शकतो. तसेच तिथे एक मेणबत्ती स्टँडदेखील आहे. कम्युनिटी चॉइस रियल्टीचे टॉम फिंचम यांनी घराची किंमत ९७ लाख ९ हजार डॉलर असल्याचा अंदाज बांधला आहे. पण या घराची खरी किंमत २०२१ मध्ये १.२ मिलियन डॉलरएवढी होती.

या बाथरुमचे फोटो पाहिल्यावर केवळ सिंहासनासारखं दिसणारं टॉयलेटच नाही, तर इतर वस्तूदेखील लक्ष वेधून घेतात. टॉयलेटच्या शेजारी भिंतीवर लटकवण्यात आलेली शोची वस्तू, भलामोठा आरसा (mirror) आणि बेसिनच्या शेजारी असलेलं शोपीस (show piece) खूपचं युनिक आहे. बेसिनचा नळ तर अगदी हँडपंपासारखा दिसतो. त्यामुळे हा फोटो पाहिल्यावर आपण जुन्या काळातील राजा महाराजांचे राजवाडे आणि महाल पाहत असल्यासारखं वाटतं. हौसेला खरंच मोल नसतं, याची प्रचिती या घराचे फोटो पाहिल्यावर येते.

Web Title: Michigan royal house has 979000 dollars toilet that looks like king throne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.