मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर डाउन झाल्याने जगभर हाहाकार; बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरली?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 10:05 PM2024-07-19T22:05:50+5:302024-07-19T22:05:50+5:30
आज अचानक Microsoft च्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बँकांपासून ते विमान वाहतुकीपर्यंत महत्वाच्या सेवा ठप्प झाल्या आहेत.
Microsoft Outage : टेक जायंट Microsoft च्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जगभर हाहाकार माजला आहे. जगभरातील करोडो मायक्रोसॉफ्ट विंडोज युजर्स आहेत, ज्यांना आपले कॉम्प्युटर/लॅपटॉप वापरण्यात अडचणी येत आहेत. विशेष म्हणजे, या तांत्रिक बिघाडामुळे जगभरात बँकांपासून ते रेल्वे अन् विमान वाहतुकीसारख्या महत्वाच्या सेवा ठप्प झाल्या आहेत. अनेक देशांनी तर आपत्कालीन बैठकही बोलावली आहे. अशातच आता, प्रसिद्ध भविष्यकार बाबा वेंगा चर्चेत आले आहेत. त्यांनी फार वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्टबाबत भविष्यवाणी केल्याचा दावा केला जातोय.
बाबा वेंगा काय म्हणाले?
बाबा वेंगा यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1911 रोजी बल्गेरियात झाला, तर 11 ऑगस्ट 1996 रोजी त्यांचा मृत्यू झाला. आपल्या 84 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अनेक गोष्टींची भविष्यवाणी करुन ठेवली आहे. त्यातील अनेक गोष्टी खऱ्या ठरल्या आहेत. त्यांनी 2024 सालासाठी भाकीत केले होते, जे आता खरे ठरताना दिसत आहे. त्यांनी आपल्या भविष्यवाणीत म्हटले होते की, 2024 मध्ये मोठी तांत्रिक आणि नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. आता जगभर मायक्रोसॉफ्ट डाऊन झाल्यामुळे, लोक बाबा वेंगा यांच्या तांत्रिक आपत्तीचा संदर्भ येथे जोडत आहेत. मायक्रोसॉफ्ट डाउन होणे, ही मोठी तांत्रिक आपत्तीच आहे. कारण, जगभरात मायक्रोसॉफ्टच्या विंडोजचे करोडो युजर्स आहेत.
बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्यांची यादी
असे म्हटले जाते की बाबा वेंगा यांनी 12 वर्षांचे असताना दृष्टी गमावली. असा दावा केला जातो की, त्यांना दैवी दृष्टी होती, त्यामुळेच त्यांनी काही वर्षांसाठीच नव्हे, तर सन 5079 पर्यंतची भविष्यवाणी करुन ठेवली आहे. त्याच्या भाकितांची यादी बरीच मोठी आहे. बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, 5079 मध्ये जगाचा नाश होईल आणि 2025 पासून त्याची सुरुवात होईल. त्यांनी यापूर्वी 9/11 हल्ला, कोरोना यांसह अनेक मोठ्या घटनांची भविष्यवाणी केल्याचा दावा केला जातो.