करोडपती बिझनेसमन झाला 'कंगाल'; रस्त्याच्या कडेला सुरू केला स्टॉल, आता विकतोय कबाब
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 12:50 PM2022-11-23T12:50:08+5:302022-11-23T12:59:18+5:30
एक करोडपती बिझनेसमन कंगाल झाला आहे. रस्त्याच्या कडेला स्टॉल सुरू केला असून कबाब विकत आहे. त्याच्या डोक्यावर तब्बल 52 कोटींहून अधिक कर्ज आहे
कोणाचं नशीब कसं, कधी बदलेल हे सांगता येत नाही. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एक करोडपती बिझनेसमन कंगाल झाला आहे. रस्त्याच्या कडेला स्टॉल सुरू केला असून कबाब विकत आहे. त्याच्या डोक्यावर तब्बल 52 कोटींहून अधिक कर्ज आहे. ते कर्ज फेडण्यासाठी त्याने रस्त्याच्या बाजुला दुकान सुरू केलं आहे. चीनच्या सोशल मीडियावर सध्या या व्यक्तीची चर्चा रंगली आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, 52 वर्षीय तांग जियान हे काही वर्षांपूर्वी एक यशस्वी बिझनेसमन होते. त्यांची रेस्टॉरंटची चेन होती. वय़ाच्या 36 व्या वर्षीचं कोट्यवधींची संपत्ती होती. मात्र 2005 नंतर जियान यांचं नशीब बदललं. त्यांनी त्यांच्याकडे असलेले पैसे एका उद्योगामध्ये गुंतवले. त्यावेळी त्यांना त्या उद्योगाची फारशी माहिती नव्हती. अनेकांनी त्यांना हे करण्यापासून रोखलं. पण तरी त्यांनी एक मोठी रक्कम गुंतवली आणि त्यांचा हाच निर्णय चुकीचा ठरला.
डोक्यावर 52 कोटींचं कर्ज
जियान हे एका झटक्यात कंगाल झाले आणि त्यांच्या डोक्यावर कोट्यवधी रुपयांचं कर्ज झालं. शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी कर्ज फेडण्यासाठी आपली सर्व रेस्टॉरंट, घरं आणि कार विकल्या. तरी सुद्धा जियान यांच्या डोक्यावर 52 कोटींचं कर्ज हे बाकीच आहे. हेच कर्ज फेडण्यासाठी त्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी रेस्टॉरंटमध्ये स्वत: काम करण्यास सुरुवात केली.
एकेकाळी करोडपती असलेल्या तांग जियान यांनी आता रस्त्याच्या कडेला एका स्टॉल सुरू केला आणि तिथे कबाब विकत आहेत. जियान यांच्या संघर्षाची ही कहाणी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच अनेकांनी त्यांना प्रोत्साहन दिलं आहे. जियान यांनी कठीण परिस्थितीचा शांतीने सामना करा, पुढे जात राहा, आयुष्यात असं काहीना काही होत राहतं असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"