काय सांगता? लेक कोट्यधीश पण आई-वडील घासायला लावतात भांडी; करते घरातली कामं, म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 04:56 PM2023-06-24T16:56:12+5:302023-06-24T17:01:08+5:30
कोट्याधीश असलेल्या एका मुलीला तिचे आई-वडील भांडी घासायला लावतात. ती कपडे व्यवस्थित ठेवते आणि घरातील इतर कामं देखील आवडीने करते.
सामान्यतः लोकांकडे पैसा येताच त्यांचे राहणीमान अचानक इतके उंचावते की त्यांना स्वत: कोणतंच काम करावंस वाटत नाही, पण आता अशी एक घटना समोर आली आहे जी समजल्यावर तुम्ही हैराण व्हाल. कोट्याधीश असलेल्या एका मुलीला तिचे आई-वडील भांडी घासायला लावतात. ती कपडे व्यवस्थित ठेवते आणि घरातील इतर कामं देखील आवडीने करते.
अमेरिकेतील सर्वात तरुण सेल्फ मेड करोडपती मुलगी इसाबेला बॅरेटची ही गोष्ट आहे. बेला नावाने प्रसिद्ध असलेली इसाबेला केवळ 17 वर्षांची आहे आणि तिची दरमहा कमाई 8 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. ती फॅशन आणि एक्टिंग इंडस्ट्रीत काम करते आणि फॅशन वीकमध्ये तिची कमाई अवघ्या 7 दिवसांत 28 लाखांवर जाते.
बँकेत कोट्यवधी तरीही घरी घासते भांडी
मिररमधील एका रिपोर्टनुसार, इसाबेलाने स्वतःची ज्वेलरी लाइन Glitzy Girl लॉन्च केली आहे आणि मोठ्या ब्रँडसाठी मॉडेलिंग करते. ती साधारणपणे तिच्या मेकअपवर दिवसाला 28,000 रुपये खर्च करते पण जेव्हा ती घरी असते तेव्हा ती तिचे काम सामान्य माणसाप्रमाणे करते. तिचे आई-वडील तिला अजिबात स्पेशल ट्रिट करत नाहीत. ती इतर मुलांप्रमाणे भांडी घासते, कपडे उचलते आणि घरातील कामं करते.
इसाबेला म्हणते की, तिचे आई-वडील अनेकदा सांगतात की ती अमूल्य आणि खूप हुशार आहे पण तिला कोणतीही विशेष वागणूक दिली जात नाही. आयुष्यात इतकं काही मिळवता आलं असेल तर ते तिच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यामुळेच असं ती म्हणते. कधीही हार मानू नये असा सल्ला ती इतरांनाही देते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.