ऐकावं ते नवलच! करोडपती महिलेचं मोठं मन; लोकांमध्ये वाटतेय 24 कोटी, ठेवलीय 'ही' एक अट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 12:40 PM2023-02-09T12:40:42+5:302023-02-09T12:48:39+5:30
श्रीमंत महिलेने आपल्या वाढदिवशी लोकांना भेट म्हणून 82-82 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
एका श्रीमंत महिलेने आपल्या वाढदिवशी लोकांना भेट म्हणून 82-82 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. ती एकूण 24 कोटी रुपये वितरित करत आहे. ती तिच्या देशातील सर्वात श्रीमंत महिला देखील आहे. पण तिने लकी ड्रॉसाठी एक अट ठेवली आहे, ज्यामध्ये फक्त तेच लोक सहभागी होऊ शकतात ज्यांनी तिच्या कंपनीत काम केले आहे. महिला लकी ड्रॉद्वारे 41 लोकांची निवड करेल.
करोडपती असलेल्या महिलेच्या कंपनीत सध्या एकूण 4000 लोक काम करतात. यापूर्वीच या महिला बॉसने ख्रिसमसनिमित्त कर्मचाऱ्यांना भरघोस बोनस दिला होता. ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या या अब्जाधीश महिलेचे नाव जीना राइनहार्ट असं आहे. राइनहार्ट यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1954 रोजी झाला. एका रिपोर्टनुसार, 69 वर्षीय राइनहार्ट 34 बिलियन डॉलर्सच्या संपत्तीसह ऑस्ट्रेलियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.
41 जणांना 82 लाख रुपये रोख देणार
राइनहार्ट हे हॅनकॉक प्रॉस्पेक्टिंग या मायनिंग, एनर्जी एग्रीकल्चरल कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षा आहेत. ही कंपनी त्यांच्या वडिलांनी स्थापन केली होती. वाढदिवशी 41 भाग्यवान लोकांना 82-82 लाख रुपये रोख देणार आहे. यासाठी राइनहार्ट 24 कोटींहून अधिक खर्च करणार आहे. यापूर्वी त्यांनी ख्रिसमसच्या दिवशी त्यांची कंपनी रॉय हिलमधील 10 कर्मचाऱ्यांना 82-82 लाख रुपये बोनस म्हणून दिले होते.
news.com.au च्या रिपोर्टनुसार, Rinehart च्या कंपनीने गेल्या 12 महिन्यांत 3.3 अब्ज डॉलर (190 अब्ज रुपयांहून अधिक) नफा कमावला आहे. यासाठी त्यांनी आपल्या कर्मचार्यांचे आभार मानले आणि सांगितले की जेव्हा त्यांच्या कंपनीने इतकी चांगली कामगिरी केली तेव्हा ऑस्ट्रेलियालाही खूप फायदा झाला. त्यामुळे आनंद वाटण्यासाठी पैसे देण्याची घोषणा केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"