बाबो! खोदकामात मजुराला सापडला ४४२ कॅरेटचा हिरा, किंमत वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 10:26 AM2020-08-24T10:26:55+5:302020-08-24T10:46:10+5:30

हा मजूर Lesotho च्या Letseng खाणीत काम करत होता. जेम डायमंड लिमिटेडने हा हिरा ४४२ कॅरेट असल्याचे सांगितले तसेच याची किंमतही कोट्यवधी असल्याची चर्चा आहे.

miner digs out 442 carat diamond worth rs 135 crore | बाबो! खोदकामात मजुराला सापडला ४४२ कॅरेटचा हिरा, किंमत वाचून व्हाल अवाक्...

बाबो! खोदकामात मजुराला सापडला ४४२ कॅरेटचा हिरा, किंमत वाचून व्हाल अवाक्...

googlenewsNext

हिऱ्यांच्या खाणीत काम करणाऱ्या एका मजुराचं नशीब चांगलंच चमकलं आहे. कारण त्याच्या हाती कोट्यवधी रूपयांचा हिरा लागलाय. हा मजूर Lesotho च्या Letseng खाणीत काम करत होता. जेम डायमंड लिमिटेडने हा हिरा ४४२ कॅरेट असल्याचे सांगितले तसेच याची किंमतही कोट्यवधी असल्याची चर्चा आहे.

बीएमओ कॅपिटल मार्केटच्या अ‍ॅनालिस्टनुसार, हा ४४२ कॅरेटचा हिरा साधारण १३५ कोटी रूपयांना मार्केटमध्ये विकला जाऊ शकतो. गल्फ न्यूजच्या एका रिपोर्टनुसार,  Letsent येथी हिऱ्याची खाण ही आपल्या हिऱ्याच्या आकारासाठी आणि गुणवत्तेसाठी ओळखली जाते. या खाणीतून निघणाऱ्या हिऱ्यांना पदरेशात मोठी किंमत दिली जाते.

दोन वर्षांआधीच या खाणीत तब्बल ९१० कॅरेटचा स्टोन मिळाला होता. याचा आकार गोन गोल्फच्या बॉल इतकी होती. या हिऱ्याला ४० मिलियन डॉलर इतकी किंमत मिळाली होती. हा एक प्रकारचा वेगळ स्टोन होता. ज्याची जगभरात फार मागणी आहे. ग्लोबल डायमंड इंडस्ट्रीवरही कोरोना व्हायरसचा फार प्रभाव पडला आहे. या इंडस्ट्रीला वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ज्वेलरी स्टोर्स बंद पडले आहेत.

दरम्यान, खोदकाम करत असताना गृहस्थाला अनोखा दगड सापडला होता. तुमचा विश्वास बसणार नाही पण हाच दगड विकून या गृहस्थाने तब्बल १४.७  कोटी रुपये कमावले आहेत. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी या व्यक्तीच्या हाती असाच एक दगड लागला होता. तो दगड विकून या गृहस्थाने २३.५ कोटी रुपये मिळवले होते.

डेलीमेलने दिलेल्या माहितीनुसार दोनवेळा कोट्यावधी रुपये कमावणाऱ्या गृहस्थाचं नाव सॅनिनिऊ लॅजेर आहे. सॅनिनिऊ लॅजेर हा टांझानियाचा रहिवासी आहे. त्याठिकाणच्या खाणीत खोदकाम करण्याचं काम सॅनिनिऊ करतो. टांझानिया हा देश केनिया आणि झिंबाम्वेजवळ स्थित आहे. या माणसाचे वय ५० असून त्यांना तब्बल ३० मुलं आहेत. सॅनिनिऊ लॅजेरला यांना मिळालेल्या दगडाचं वजन ६.३ किलो होतं. सोमवारी एका खास समारंभात हा दगड त्यांनी १४.७ कोटींना विकला. शेकडो लोकांच्या उपस्थित हा समारंभ पार पडला. सॅनिनिऊ यांना एकूण तीन लग्न झाली असून तीस मुलं आहेत.

या रकमेतून शाळा आणि शॉपिंग मॉल्स तयार करण्याच्या विचारात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, इतके पैसे मिळाल्यानंतरही आपलं राहणीमान बदलणार नाही.  २००० गाईंची देखभाल  करण्याचे काम सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. सॅनिनिऊ यांना सापडलेला दगड खूप दुर्मिळ आहे. या दगडाला Gemstone असं म्हणतात.

हे पण वाचा:

महात्मा गांधीजींच्या चष्म्याची २.५५ कोटींना विक्री; नवीन मालक अमेरिकन

Video : नेमकं स्फोटावेळी जन्माला आलंं हे बाळ, व्हिडीओ पाहून लोक म्हणू लागले - George The Miracle!

आश्चर्य! दुर्मिळ सोनेरी कासव आढळला; विष्णूचा अवतार मानून लोकांची दर्शनासाठी रांग

Web Title: miner digs out 442 carat diamond worth rs 135 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.