काय सांगता? चेहरा पाहण्यासाठी नाही तर लिफ्टमध्ये 'या'साठी असतो आरसा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 03:07 PM2023-05-08T15:07:04+5:302023-05-08T15:14:36+5:30
लिफ्टच्या साहाय्याने उंच इमारतीत वर जाण्यासाठी लोकांना जास्त कष्ट करावे लागत नाहीत किंवा जास्त वेळ वाया घालवावा लागत नाही.
विज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवाची अनेक कामे सोपी झाली आहेत. आजच्या आधुनिक जीवनात तंत्रज्ञानामुळे जवळपास सर्वच गोष्टी मॉर्डन लाईफच्या दिशेने वाटचाल करताना दिसतात. तंत्रज्ञानाने जगभरातील लाखो लोकांची कामं सोपी केली जात आहेत. मोबाईल असो की लॅपटॉप, सगळ्याच कामात जग बदलले आहे.
असाच एक जबरदस्त शोध म्हणजे लिफ्ट. लिफ्टच्या साहाय्याने वर उंच इमारतीत जाण्यासाठी लोकांना जास्त कष्ट करावे लागत नाहीत किंवा जास्त वेळ वाया घालवावा लागत नाही. जिना चढण्याऐवजी लिफ्टमुळे आपण पटकन वर पोहोचतो. कार्यालये, मॉल्स आणि इतर उंच इमारतींमध्ये लिफ्टची सुविधा उपलब्ध आहे. आपण सर्वजण आपल्या दैनंदिन जीवनात लिफ्टचा वापर करत असतो. अलीकडे काही काळापासून लिफ्टमध्ये आरसा बसविण्यास सुरुवात झाली आहे.
तुम्ही देखील अनेक लिफ्टमध्ये आरसेही पाहिले असतील. हे आरसे तुमचा चेहरा पाहण्यासाठी नसतात. यामागे कारण आहे. आरशामुळे लिफ्टचा आतील भाग मोकळा दिसतो आणि जास्त जागा दिसते, त्यामुळे लोकांना गुदमरल्यासारखे वाटत नाही. लिफ्टच्या आत असणाऱ्या लोकांनाही बरे वाटते. जेव्हा लोकांनी लिफ्ट वापरण्यास सुरुवात केली तेव्हा अनेकांना लिफ्टचा वेग खूप वेगवान वाटू लागला.
लोकांनी लिफ्टबाबत अशा तक्रारी केल्या आणि मग त्यामागचे कारण काय हे समजले. असे घडते कारण लोक लिफ्टच्या भिंतींवर लक्ष केंद्रित करतात, ज्यामुळे त्यांना लिफ्ट अधिक वेगाने जात असल्यासारखी वाटते. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी, लिफ्टच्या भिंतींवर आरसा बसवण्यास सुरुवात केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.