कचऱ्यातील अन्न खातो हा कोट्याधीश व्यक्ती, 10 घरांचा मालक असूनही राहतो रस्त्यावर...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 10:02 AM2024-02-23T10:02:53+5:302024-02-23T10:04:25+5:30

तुम्ही अंदाज लावू शकत नाही की, तो किती संपत्तीचा मालक आहे. हा कोट्याधीश जसं आयुष्य जगतो ती सामान्य एखाद्या रस्त्यावर राहणाऱ्या व्यक्तीची असते.

Miser millionaire has 10 houses but takes food through trash | कचऱ्यातील अन्न खातो हा कोट्याधीश व्यक्ती, 10 घरांचा मालक असूनही राहतो रस्त्यावर...

कचऱ्यातील अन्न खातो हा कोट्याधीश व्यक्ती, 10 घरांचा मालक असूनही राहतो रस्त्यावर...

सगळ्यांचंच स्वप्न असतं की, त्यांच्याकडे पैसे असल्यावर काय काय करावं. कुणी मोठं घर घेतं तर कुणी जगभरात फिरण्याचा विचार करतं. तेच काही लोक असेही असतात ज्यांना पैशातून पैसे बनवायचे असतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबाबत सांगणार आहोत जरा फारच वेगळा आहे.

जर्मनीमध्ये राहणाऱ्या या कोट्याधीश व्यक्तीचं नाव हेंज बी (Heinz B.) आहे आणि त्याला पाहून तुम्ही अंदाज लावू शकत नाही की, तो किती संपत्तीचा मालक आहे. हा कोट्याधीश जसं आयुष्य जगतो ती सामान्य एखाद्या रस्त्यावर राहणाऱ्या व्यक्तीची असते. या व्यक्तीकडे 10 पेक्षा जास्त घरे आहेत. पण तरीही तो कचऱ्यातून आपल्यासाठी जेवण शोधतो.

सामान्यपणे लोक खाण्यावर जास्त खर्च करतात. पण या व्यक्तीचा जेवणावर महिन्याला केवळ 450 रूपये खर्च आहे. तेही तेव्हा जेव्हा त्याला एखादा पदार्थ फ्राय करण्यासाठी तेल हवं असतं. बाकी तो कचऱ्यात फेकलेलं अन्नच खातो. त्याचं मत असं आहे की, लोक इतकं अन्न फेकतात की, ज्यातून एका परिवाराचं पोट आरामात भरू शकतं. त्याशिवाय त्याचा खर्च केवळ लॅपटॉपचं इंटरनेट आणि फोन कॉलचा होतो.

किती आहे त्याची संपत्ती

आता आम्ही तुम्हाला त्याच्या संपत्तीबाबत सांगत आहोत. 2021 मध्ये त्याच्याकडे 7 घरे आणि 2 अपार्टमेंट होते. तर बॅंकमध्ये 4 कोटी रूपये जमा होते. या पैशांचा वापर करून त्याने घर खरेदी केले आणि आता तो 10 घरांचा मालक आहे. त्याशिवाय 90 लाख रूपयांचं फिक्स डिपॉझिट आहे. त्याला दर महिन्याला 3 लाख 23 हजार रूपये पेंशन मिळतं. दुसऱ्या एका पेंशनमधून त्याला 14 हजार रूपये मिळतात. इतकं सगळं असूनही हेंज आपलं जीवन एखाद्या भिकारी व्यक्तीसारखं जगतो. 
 

Web Title: Miser millionaire has 10 houses but takes food through trash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.