बॉयफ्रेंडच्या मृत्यूनंतर त्याच्या बाळाला दिला जन्म, आता संपत्तीमध्ये मागत आहे शेअर, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 09:36 AM2024-05-09T09:36:03+5:302024-05-09T09:36:38+5:30
व्यक्तीचा एका रोड अपघातात मृत्यू झाला होता ज्यानंतर हा वाद सुरू झाला आणि यावरून आता सोशल मीडियावरही चर्चा सुरू आहे.
नेहमीच अशा अनेक घटना समोर येतात ज्यात लग्न न करता जन्माला आलेली किंवा त्यांची आई, वडिलांच्या संपत्तीत हिस्सा मागतात. पण चीनमधील लेंग नावाच्या एका महिलेने विवाहित असलेल्या आपल्या बिझनेसमन बॉयफ्रेंड वेनच्या मृत्यूनंतर जन्माला आलेल्या मुलाला वेनचा असल्याचं सांगितलं. आता ती बॉयफ्रेंडच्या पत्नीकडे मुलासाठी संपत्तीत हिस्सा मागत आहे.
व्यक्तीचा एका रोड अपघातात मृत्यू झाला होता ज्यानंतर हा वाद सुरू झाला आणि यावरून आता सोशल मीडियावरही चर्चा सुरू आहे. प्रश्न असा उपस्थित राहतो की, महिलेने 2021 मध्ये झालेल्या बॉयफ्रेंडच्या मृत्यूनंतर त्याच्या बाळाला जन्म कसा दिला? महिलेने सांगितलं की, तिने एग्स फ्रीज केले होते. त्यानंतर तिने ते वेनच्या स्पर्मसोबत फर्टिलाइज करून भ्रूणाला एक फर्टिलिटी क्लीनिकमध्ये फ्रीज केलं होतं. आता जेव्हा तिने त्याच भ्रूणाला जन्म दिला त्यानंतर ती आता मुलासाठी बॉयफ्रेंडच्या संपत्तीत हिस्सा मागत आहे. लेंगचा दावा आहे की, हा मुलगा वेनचा आहे.
2021 च्या डिसेंबरमध्ये तिने एका बाळाला जन्म दिला होता. त्याचं नाव तिने जियाओवेन ठेवलं आणि गेल्यावर्षी म्हणजे 2023 च्या ऑगस्टमध्ये तिने आपल्या बॉयफ्रेंडच्या परिवाराला केस दाखल केली. त्यानंतर मुलासाठी संपत्ती हिस्सा मागितला.
महिलेने वेनचा उत्तराधिकारी म्हणून मुलासाठी संपत्ती, कंपनी इक्विटी शेअर आणि विम्याची मागणी केली. पण महिला हे सिद्ध करू शकली नाही की, मुलाला वेनच्या स्पर्मनेच फर्टिलाइज केलं गेलं होतं किंवा त्याने यासाठी सहमती दिली होती. त्यामुळे तिचा दावा कोर्टाने फेटाळला. कोर्टाच्या निर्णयानंतर ही घटना चीनच्या मीडियात चर्चेत आहे.