ओव्हरटेक केल्यामुळे हत्या करणारा आमदारपुत्र अटकेत
By admin | Published: May 10, 2016 07:04 AM2016-05-10T07:04:49+5:302016-05-10T10:38:04+5:30
कार ओव्हरटेक केल्यामुळे संतप्त होत एका २० वर्षीय युवकाला गोळ्या झाडून ठार करणारा संजदच्या( जेडी-यू) आमदार मनोरमा देवी यांचा मुलगा रॉकी कुमार यादव याला अखेर अटक करण्यात आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
गया, दिय. १० : कार ओव्हरटेक केल्यामुळे संतप्त होत एका २० वर्षीय युवकाला गोळ्या झाडून ठार करणारा संजदच्या( जेडी-यू) आमदार मनोरमा देवी यांचा मुलगा रॉकी कुमार यादव याला अखेर अटक करण्यात आली आहे. शनिवारी घटना घडल्यानंतर रॉकी फरार होता. रॉकीला गया येथून त्याच्या वडिलांच्या घरातून अटक करण्यात आली आहे.
रॉकी कुमारच्या अटकेला पोलीस अधीक्षक गरीमा मलिक यांनी दुजोरा दिला आहे. पोलींसानी आमदार मनोरमा देवी यांच्याशी ३ तास चौकशी केल्यानंतर त्यांच्या घरातून रॉकीला अटक करण्यात आली आहे. बिहारच्या गया येथे पोलीसलाईनजवळ ओव्हरटेक केले म्हणून रॉकीने २० वर्षीय तरुणाची हत्या केली. त्यानंतर या भागात नागरिकांनी जोरदार निषेध करीत रॉकीच्या अटकेची मागणी केली होती.
रॉकी यादवने आपला गुन्हा कबूल केल्याची माहिती पोलिसांनी दिली असताना रॉकी यादव प्रसारमाध्यमांसमोर मात्र आपण आदित्यकुमार सचदेवावर गोळ्या झाडल्या नसल्याचा दावा करत आहे.
#WATCH: JDU MLC's son & main accused Rocky Yadav denies having fired shots at the deceased Aditya Sachdeva in Bihar.https://t.co/NIfVjl9Pnn
— ANI (@ANI_news) May 10, 2016
दरम्यान, विधान परिषदेच्या सदस्य असलेल्या मनोरमादेवी यांचे पती बिंदेश्वरीप्रसाद यादव ऊर्फ बिंदी यादव आणि त्यांचा सुरक्षा रक्षक राजेश कुमार यांना पोलिसांनी शनिवारीच अटक केली आहे. रॉकी आणि त्यांच्यासोबत असलेल्यांच्या कारला २० वर्षीय आदित्यकुमार सचदेवा आणि त्याच्या चार मित्रांच्या कारने ओव्हरटेक केले होते. त्यानंतर रॉकीने या कारला रोखत गोळ्या झाडल्या होत्या.
Bihar:JDU MLC Manorama Devi's son Rocky arrested in connection with killing of a youth Aditya (in pic:revolver used) pic.twitter.com/T4lbgjeReB
— ANI (@ANI_news) May 10, 2016