सावधान! मोबाईलच्या अतिवापरामुळे तरूणी झाली अपंग, फोनवर घालवत होती 14 तास वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 10:32 AM2023-02-27T10:32:18+5:302023-02-27T10:32:52+5:30

cyber sickness : फेनिला फॉक्स एक सोशल मीडिया इंफ्लुएंसर आहे. इंस्टाग्रामवर तिचे दीड लाख फॉलोवर आहेत. इतकंच नाही तर सोशल मीडियावरून ती साधारण 15 हजार डॉलर कमाई करत होती.

Mobile caused cyber sickness woman's life became crippled due to mobile phone addiction | सावधान! मोबाईलच्या अतिवापरामुळे तरूणी झाली अपंग, फोनवर घालवत होती 14 तास वेळ

सावधान! मोबाईलच्या अतिवापरामुळे तरूणी झाली अपंग, फोनवर घालवत होती 14 तास वेळ

googlenewsNext

cyber sickness : नेहमीच वेगवेगळ्या अजब आजारांबाबत माहिती समोर येत असते. पण काही केसेस अशाही असतात ज्यात व्यक्तीला आजारही नसतो तरी त्यांना व्हीलचेअरवर बसावं लागतं. अशाच एका तरूणीबाबत आम्ही सांगणार आहोत. तिला आता आयुष्यभर व्हीलचेअरवर रहावं लागणार आहे कारण दिवसातील 14 तास ती फोनवर राहत होती. फेनिला फॉक्स नावाच्या या तरूणीसोबत जे झालं ते वाचून तुम्हीही हैराण व्हाल.

फेनिला फॉक्स एक सोशल मीडिया इंफ्लुएंसर आहे. इंस्टाग्रामवर तिचे दीड लाख फॉलोवर आहेत. इतकंच नाही तर सोशल मीडियावरून ती साधारण 15 हजार डॉलर कमाई करत होती. 2021 च्या सुरूवातीला फेनिला पोर्तुगालमध्ये राहत होती. तेव्हाच तिला डोकं आणि मान दुखण्याची समस्या झाली. डॉक्टरांकडे गेल्यावर सुरूवातीला डॉक्टरांना तिच्या आजाराचं निदान लागलं नाही. दुसरीकडे तिची तब्येत दिवसेंदिवस वाढत होती. अशात तिने ब्रिटनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तिथे तिचे आई-वडील राहत होते.

ब्रिटनला आल्यानंतर एअरपोर्टवर फॉक्सच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. तिची समस्या वाढली आणि तिला व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागला. तिचे आई-वडील डॉक्टरांशी बोलले. पण डॉक्टरांना तिच्या आजाराबाबत काही समजलं नाही. अचानक फेनिलाच्या वडिलांनी एक दिवस सायबर सिकनेसबाबत वाचलं. तेव्हा समजं की, फॉक्स सायबर सिकनेस किंवा डिजिटल वर्टिगोची शिकार झाली आहे.

सायबर सिकनेस एख अशी अवस्था आहे ज्यात व्यक्ती कन्फ्यूज राहू लागतो. त्यांचे डोळे वेगळंच काही बघत असतात. पण कान आणि मेंदू वेगळंच काही ऐकत आणि समजत असतात. तुम्ही मोशन सिकनेसबाबत ऐकलं असेल. जेव्हा तुम्ही दिवसभर स्क्रीन समोर घालवता तेव्हा याने व्हिजुअल वेस्टिबलर कन्फ्लिक्टसारखी स्थिती तयार होते, जी एक मोशन सिकनेसचं कारण ठरते. अशीच स्थिती सायबर सिकनेसमध्ये येते. सध्या फॉक्सवर उपचार सुरू आहे आणि आता ती मोबाईलपासून दूर राहते. पण जर तुमच्या परिचयातील कुणी मोबाईलच्या अॅडिक्शनमध्ये फसत असेल तर त्यांना सावध करा. कारण मोबाईल तुम्हाला अपंग करू शकतो.

Web Title: Mobile caused cyber sickness woman's life became crippled due to mobile phone addiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.