मॉडल म्हणाली - 'पती केवळ मुलांना जन्म देण्यासाठी! रोमान्ससाठी आहे बॉयफ्रेन्ड'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 01:26 PM2022-03-28T13:26:10+5:302022-03-28T13:27:07+5:30
Open Relationship : ओपन रिलेशनशिप म्हणजे दोन्ही पार्टनर दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीसोबत रोमान्स करू शकतात आणि याला दगा मानलं जात नाही.
एका मॉडलने तिच्या आयुष्याची कहाणी शेअर करत सांगितलं की, ती केवळ मुलांना जन्म देण्यासाठी तिच्या पतीसोबत आहे. तर रोमान्स आणि मस्ती करण्यासाठी तिने आजही बॉयफ्रेन्डसोबत नातं कायम ठेवलं आहे. डेजी नावाने ओळखळी जाणाऱ्या मॉडलने ब्रिटिश वेबसाइट डेली स्टारला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ती आणि तिचा पती एका ओपन रिलेशनशिपमध्ये आहे. ओपन रिलेशनशिप म्हणजे दोन्ही पार्टनर दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीसोबत रोमान्स करू शकतात आणि याला दगा मानलं जात नाही.
डेजी म्हणाली की, तिला पती असेक्शूअल (म्हणजे ज्यांना सेक्समध्ये फार कमी रस असतो असे लोक) आहे. डेजी म्हणाली की, ती नेहमीच तिच्या बॉयफ्रेन्डला भेटते आणि दोघेही सोबत चांगला वेळ घालवतात. डेजी दोन मुलांची आई आहे आणि लवकरच तिसऱ्या मुलाची आई होणार आहे. मात्र, ती हे स्वीकार करते की ओपन रिलेशनशिपमध्ये स्थिती थोडी असहज होऊ शकते.
पती, पत्नी और वो...
डेजीची कहाणी फार वेगळी आहे. तेच ब्रिटनच्या इस्ट ससेक्समध्ये राहणाऱ्या एक थ्रपलची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही पती, पत्नी और वो ची कहाणी आहे. जे एकमेकांच्या सहमतीने एकत्र परिवार म्हणून राहतात.
EXCLUSIVE: Husband, wife and girlfriend become throuple after joke leads to three-way family https://t.co/Lp6ETcbuWSpic.twitter.com/xCjU7oWji2
— The Mirror (@DailyMirror) March 26, 2022
टॉम हिलयार्ड, त्याची पत्नी लेजली आणि गर्लफ्रेन्ड एम्मा कूंबर. यांच्या थ्रपल रिलेशनशिपची सुरूवात तेव्हा झाली होती जेव्हा टॉमने एकदा गंमतीत एका महिलेला आपल्या नात्यात सहभागी होण्यााबाबत विचारलं होतं. तिघेही गेल्या २ वर्षांपासून सोबत राहतात. टॉमची पत्नी लेजली सुद्धा एम्माच्या प्रेमात पडली. तिघे घरातील कामंही वाटून घेतात आणि बिल भरतात.
बायसेक्शुअल लेजली सांगते की, थ्रपलबाबत अनेक लोकांच्या मनात पूर्वग्रह असतात. ते नेहमी याकडे एक विचित्र आयडिया म्हणून बघतात. पण हे सत्य नाहीये. आम्ही तिघेही एकमेकांच्या प्रेमात आहोत. एखाद्या दुसऱ्या कपलप्रमाणे. फरक इतकाच आहे की, आम्ही तिघे आहोत.