एका बांधकाम मजुराच्या प्रेमात पडली कोट्यावधी रूपये कमाई करणारी मॉडल, अवाक् करणारं आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 06:17 PM2022-01-24T18:17:10+5:302022-01-24T18:19:30+5:30
साइटवर मोठ्या संख्येने लोक तिला फॉलो करतात. ज्यातून तिची रग्गड कमाई होते. दर महिन्याच्या हिशेबाने व्हिडीओज आणि फोटोंच्या सब्सक्रिप्शनच्या आधारावर तिला पैसे मिळतात.
आपल्या पार्टनरबाबत प्रत्येक मुलीची वेगवेगळी चॉइस असते. जी अनेकदा त्याचा स्वभाव आणि लाइफ स्टाइलवर अवलंबून असते. पण एक मॉडल जी वर्षाला १० कोटी रूपये कमावते. तरीही तिची चॉइस सामान्य आहे. चला जाणून घेऊ यामागचं कारण.
'द मिरर'च्या वृत्तानुसार, बोनी लॉकेट नावाची ओन्ली फॅन्स मॉडल इंग्लंच्या लिंकनशायरमध्ये राहते. साइटवर मोठ्या संख्येने लोक तिला फॉलो करतात. ज्यातून तिची रग्गड कमाई होते. दर महिन्याच्या हिशेबाने व्हिडीओज आणि फोटोंच्या सब्सक्रिप्शनच्या आधारावर तिला पैसे मिळतात. मात्र, या हाय-फाय मॉडलची स्वप्नं सामान्य आहेत.
साइटवर नेहमीच फॅन्स मॉडलला प्रश्वन विचारत असतात आणि एक दिवस जेव्हा तिला पसंतीच्या विचारण्यात आलं तेव्हा तिने दिलेलं उत्तर हैराण करणारं होतं. तिने सांगितलं की, ती तिच्या लॉंग टाइम पार्टनरसोबत आहे जो फारच साधा माणूस आहे. ती म्हणाली की, ती जास्तीत जास्त वेळ शूटिंगमध्ये बिझी असते आणि आता तर स्वत:ला कॅमेरासमोर पाहून राग येतो.
एका बांधकाम मजुरावर करते प्रेम
मॉडलने सांगितलं की, मला एक साधारण मुलगा आवडतो आणि मला त्याच्यासोबतच बाहेर जायचं आहे. तिने पुढे सांगितलं की, ज्याच्यासोबत मी गेल्या ९ वर्षांपासून आहे. तो व्यवसायाने एक कारपेंटर आहे. पण मला खरंच असंच कुणीतरी हवं होतं.
बोनी लॉकेट म्हणाली की, तो एक आयडल व्यक्ती आहे. कारण गरज पडली तर तो घरातील इतरही सगळी कामं करू शकतो. कन्स्ट्रक्शन वर्कर जो एक उंच, धिप्पाड आणि हॅंडसम तरूण आहे. माझ्या टाइपचा. हेच कारण आहे की, मी त्याच्यासोबत नातं बनवलं आहे. यानंतर फॅन्सने तिला तिच्या पर्सनल लाइफबाबत अनेक प्रश्न विचारणं सुरू केलं.
यानंतर मॉडलने सांगितलं की, असं नाही की, स्कूल टाइमपासून आतापर्यंत मला कुणी अॅप्रोच केलं नाही. पण माझी चॉइस थोडी वेगळी होती. मॉडल असण्यासोबतच बोनी सिंगर आहे आणि अभिनयही केला आहे. तिने अभिनयात मास्टर डिग्री घेतली आहे. पण तिने कमाईसाठी ओन्ली फॅन्स प्लॅटफॉर्मची निवड केली.