… म्हणून आपल्या सहा पत्नींना एकत्र शॉपिंगला घेऊन जातो हा व्यक्ती, Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 09:12 PM2022-06-21T21:12:23+5:302022-06-21T21:13:46+5:30

एका मॉडेलनं आपल्या सहा पत्नींना एकत्र शॉपिंग करवण्याचा निर्णय घेतला.

model with 8 wives spend 9 lakhs on gifts keeps them all same to avoid fights see photos | … म्हणून आपल्या सहा पत्नींना एकत्र शॉपिंगला घेऊन जातो हा व्यक्ती, Photos

… म्हणून आपल्या सहा पत्नींना एकत्र शॉपिंगला घेऊन जातो हा व्यक्ती, Photos

Next

एका मॉडेलनं आपल्या सहा पत्नींना एकत्र शॉपिंग करवण्याचा निर्णय घेतला. एकाच वेळेच्या शॉपिंगमध्ये या व्यक्तीनं तब्बल ९ लाख रूपये खर्च केले. यानंतर त्यानं आपण या सर्व गोष्टींबाबत सध्या शिकत असल्याचंही त्यानं सांगितलं. ब्राझिलचा मॉडेल आर्थर ओ उर्सो पहिल्यांदा आपल्या ९ महिलांसोबत लग्न करून चर्चेत आला होता. तेव्हा त्यानं आपण फ्री लव्ह सेलिब्रेट करत असल्याचंही त्यानं म्हटलं होतं.

नुकतीच त्याची एक पत्नी त्याच्यापासून विभक्त झाली आणि सध्या तो आपल्या ८ पत्नींसह राहत आहे. आर्थरनं ब्राझिलीयन व्हॅलेंटाईन्स डेवर पत्नीवर आपलं प्रेम व्यक्त करण्यााठी गिफ्ट खरेदी करण्याचा निर्णय घेतला. १२ जून रोजी ब्राझिलीयन व्हॅलेंटाईन्स डे साजरा केला जातो.

ब्राझिलीयन व्हॅलेंटाईन्स डेच्या शॉपिंगसाठी आर्थर आपल्या सहा पत्नींसोबत गेला होता. मॉलमध्ये पोहोचून त्यानं आपल्या पत्नींसह गिफ्ट्सही खरेदी केले. आपल्या रिलेशनशिपबद्दल बोलताना आर्थर म्हणाला, मी या सर्व गोष्टींबाबत शिकत आहे. परंतु आपल्या बाजूनं मी बेस्ट देण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्याकडे एकापेक्षा जास्त पत्नी आहेत. यासाठी मला सर्वात बेस्ट असण्याची गरज आहे. आम्ही पैसे कमावतो आणि आपल्या बाजूनं बेस्ट देण्यासाठी कोणतीही कमतरता सोडत नाही, असंही त्यानं म्हटलं. आपल्या आठ पत्नींसाठी गिफ्ट खरेदी करताना त्यानं ८ लाख ६४ हजार रुपये खर्च केले. आपण सर्वांना एकसारखीच गिफ्ट दिल्याचंही तो म्हणाला.

Web Title: model with 8 wives spend 9 lakhs on gifts keeps them all same to avoid fights see photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.