विषाचा धंदा करून लाखो रूपये कमावते ही व्यक्ती, पाळले ८ हजार विंचू आणि साप...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 04:15 PM2023-01-25T16:15:32+5:302023-01-25T16:23:14+5:30
इजिप्तची राजधानी काहिरा येथे राहणारा मोहम्मद हम्दी बोष्टा नावाचा २५ वर्षीय तरूण नम नावाच्या कंपनीचा मालक आहे. हम्दी इतकं महाग विष विकतो की, आकडा वाचून तुम्ही हैराण व्हाल.
पिक, फळं आणि भाज्यांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसोबतच तुम्ही अनेक उद्योगपतींच्या यशस्वी कथा ऐकल्या असतील. पण जगात एक अशीही व्यक्ती आहे जी विंचवांचं विष विकून श्रीमंत झाली आहे. इजिप्तची राजधानी काहिरा येथे राहणारा मोहम्मद हम्दी बोष्टा नावाचा २५ वर्षीय तरूण नम नावाच्या कंपनीचा मालक आहे. हम्दी इतकं महाग विष विकतो की, आकडा वाचून तुम्ही हैराण व्हाल.
हा अजब शौक असणाऱ्या हम्दीने पुरातत्व विषयात पदवी मिळवली आहे. पण त्याला इजिप्तच्या विशाल वाळवंटातील आणि विशाल किनाऱ्यांवरील विचंवांची शिकार करण्याचा शौक होता. अशात त्याने शिक्षण सोडून आपलं पॅशन पूर्ण करण्याचं स्वप्न पाहिलं. आज तो विषाचा व्यवसाय करून इजिप्तमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे.
हम्दीने वेगवेगळ्या प्रजातीच्या ८० हजारांपेक्षा जास्त विंचू आणि साप पाळले आहेत. या विंचू आणि सापांमधून विष काढून तो औषध तयार करणाऱ्या कंपन्यांना विकतो.
विंचवांचं विष काढण्यासाठी यूवी लाइटच्या मदतीने हल्का इलेक्ट्रिक शॉक दिला जातो. इलेक्ट्रिक शॉक लागताच विंचवांचं विष बाहेर येतं. हे विष स्टोर करून ठेवलं जातं. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, विंचवाच्या एक ग्रॅम विषातून साधारण २० हजार ते ५० हजार एंटीवेनोम डोज तयार केले जाऊ शकतात.
मोहम्मद हम्दी बोष्टा विंचवांचं विषय यूरोप आणि अमेरिकेत सप्लाय करतो. येथील औषध निर्मात्या कंपन्या या विषाचा वापर एंटीवेमन डोज आणि हायपरटेंशन सारख्या आजारांवरील औषध तयार करण्यासाठी करतात. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, विंचवाचं एक ग्रॅम विष विकल्यावर त्याला १० हजार यूएस डॉलर म्हणजे साधारण ७ लाख रूपये मिळतात.