जिगरबाज आई! आपल्या मुलाला वाचवण्यासाठी Mountain Lion सोबत आईने केली फाइट, बुक्यांचा मार खाऊन पळून गेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 13:45 IST2021-08-30T13:25:34+5:302021-08-30T13:45:07+5:30
आई सिंहासमोर भिंत बनून उभी राहिली. आई सिंह हार मानत नाही तोपर्यंत त्याच्यासोबत लढत राहिली आणि आपल्या मुलाचा जीव वाचवला.

जिगरबाज आई! आपल्या मुलाला वाचवण्यासाठी Mountain Lion सोबत आईने केली फाइट, बुक्यांचा मार खाऊन पळून गेला
आपल्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी आई आपल्या जीवाची बाजी लावण्यात मागे सरत नाही. अमेरिकेतून अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एक आई आपल्या पाच वर्षीय मुलाचा जीव वाचवण्यासाठी एका खतरनाक सिंहासोबत भिडली. सिंहाने बाळावर हल्ला करत त्याला सोबत खेचत नेण्याचा प्रयत्न केला. पण आई सिंहासमोर भिंत बनून उभी राहिली. आई सिंह हार मानत नाही तोपर्यंत त्याच्यासोबत लढत राहिली आणि आपल्या मुलाचा जीव वाचवला.
'द सन'च्या रिपोर्टनुसार, ही घटना अमरिकेतील कॅलिफोर्नियातील आहे. एक मुलगा आपल्या घराबाहेर खेळत होता. Mountain Lion ने पाच वर्षीय मुलावर झेप घेतली आणि त्याला खेचत ४५ फूटापर्यंत नेलं. तेव्हाच आईने मुलाच्या ओरडण्याचा आवाज ऐकला आणि त्यानंतर जे झालं त्याचं लोकांकडून कौतुक केलं जात आहे. (हे पण वाचा : ती आई होती म्हणुनी! घरी झोपलेल्या बाळाचा गुदमरत होता श्वास, ऑफिसमध्ये बसलेल्या आईने वाचला त्याचा जीव)
आईने जेव्हा आपल्या मुलाला सिंहाच्या तोंडात पाहिलं तर तिने त्यांच्यावर झडप घेतली आणि त्याच्या तोंडावर बुक्यांनी मारा केला. त्यानंतर Mountain Lion ही चिडला आणि त्याने महिलेवर हल्ला केला. पण ती न घाबरता बुक्यांचा मारा करत राहिली. अखेर सिंहाला माघार घ्यावी लागली. तो तिथून पळून गेला. मुलाला जखमी स्थितीत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
कॅलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ फिश अॅन्ड वाइल्ड लाइफने या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, महिला सिंहाला तोपर्यंत मारत राहिली जोपर्यंत तो मुलाला सोडत नाही. आईच्या बहादुरीमुळे मुलाचा जीव वाचला. डिपार्टमेंटने हेही सांगितलं की, मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या डोक्यावर आणि शरीरावर गंभीर जखमा आहेत. हल्ल्यात मुलाच्या आईलाही जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.