अंधविश्वासाचा कहर! देव बनण्याच्या नादात पुजाऱ्याने उचललं धक्कादायक पाउल, आरीने कापला स्वत:चाच गळा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 10:29 AM2021-04-20T10:29:32+5:302021-04-20T10:35:43+5:30
या व्यक्तीचं नाव थम्माकरोण वंगपरीचा असं आहे. थम्माकरोणच्या मनात या गोष्टीने घर केलं होतं की, जर त्याने त्याचं शिर कापलं तर तो देवाचा अवतार घेणार.
अंधविश्वास एक गोष्ट आहे जी मोठ्यामोठ्यांना आपल्या सोबत संपवते. ज्याच्या डोक्यात अंधविश्वासाने घर केलं त्याच्यासाठी चूक-बरोबरमध्ये अंतर फरक करणं संपलेलं असतं. याच अंधविश्वासाच्या नादात थायलॅंडमधील एका व्यक्तीने आरीने स्वत:चा गळा चिरला. या व्यक्तीचं नाव थम्माकरोण वंगपरीचा असं आहे. थम्माकरोणच्या मनात या गोष्टीने घर केलं होतं की, जर त्याने त्याचं शिर कापलं तर तो देवाचा अवतार घेणार.
ही घटना आहे १५ एप्रिलची. थम्माकरोणचा मृतदेह थायलॅंडच्या नोंग बुआ लम्फू प्रांत मंदिरात आढळून आला. थम्माकरोण वाट फु हिन मंदिराचा पुजारी होता. त्याने एका मोठ्या आरीने आपला गळा मंदिराच्या परीसरात कापला. त्याला वाटत होतं की, अशाप्रकारे स्वत:चा बळी देऊन तो देव बनेल.
पाच वर्षापासून सुरू होतं प्लॅनिंग
थम्माकरोणला ओळखणाऱ्या लोकांनुसार, पुजारी गेल्या पाच वर्षांपासून हे कृत्य करण्याच्या तयारीत होता. त्याने अनेक लोकांना याची माहिती दिली होती. सर्वांना वाटत होतं की, पुजारी गंमत करत आहे. कुणालाही अंदाज नव्हता की, तो खरंच असं काही करेल. जेव्हा थम्माकरोणचा मृतदेह आढळला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.
पुढील जन्मात देव होणार
थम्माकरोणचा मृतदेह सर्वातआधी त्याच्या पुतण्याने पाहिला. फ्लोरवर रक्तच रक्त पसरलं होतं. बाजूला ठेवलेल्या चिठ्ठीतून याचा खुलासा झाला. त्यात थम्माकरोणने लिहिले होते की, तो गेल्या पाच वर्षांपासून या कामाची तयारी करत होता. मृत्यूनंतर तो आता देवाच्या रूपात जन्म घेईल. थम्माकोरण गेल्या ११ वर्षापासून या मंदिराचा पुजारी होता.