बौद्ध भिक्षुला रातोरात मिळाले करोडो रुपये; दान करण्यास सुरुवात, लोकांच्या लागल्या लांबच लांब रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 12:57 PM2022-03-19T12:57:18+5:302022-03-19T12:58:11+5:30
monk wins 4 crore rupees lottery : उत्तरेकडील प्रांतातील नाखोन फानोमच्या (Nakhon Phanom) या 47 वर्षीय भिक्षुचे नाव फ्रा क्रू फनोम आहे, जे Wat Phra That Phanom Woramahawihan नावाच्या मंदिराचे सचिव देखील आहे.
थायलंडमध्ये एका बौद्ध भिक्षुने चार कोटी रुपयांची लॉटरी जिंकली. त्यानंतर भिक्षुने हे लॉटरी जिंकलेले पैसे लोकांना दान करण्यास सुरुवात केली. भिक्षुने लॉटरीचे पैसे स्थानिक लोक, इतर मंदिरे आणि विविध संस्थांना दान करत आहेत. उत्तरेकडील प्रांतातील नाखोन फानोमच्या (Nakhon Phanom) या 47 वर्षीय भिक्षुचे नाव फ्रा क्रू फनोम आहे, जे Wat Phra That Phanom Woramahawihan नावाच्या मंदिराचे सचिव देखील आहे.
thethaiger.com च्या मते, भिक्षुने अलीकडेच 18 मिलियन baht (4 कोटींहून अधिक) चे लॉटरी बक्षीस जिंकले आहे. भिक्षू आता लॉटरीची रक्कम दान करत आहेत. भिक्षू म्हणाले की, सहसा लॉटरीची तिकिटे खरेदी करत नाही कारण भिक्षुंनी कोणत्याही प्रकारचा जुगार खेळू नये. पण काही दिवसांपूर्वी त्यांनी एका स्थानिक दुकानदाराच्या मदतीसाठी लॉटरीचे तिकीट घेतले होते. कोरोना महामारीच्या काळात दुकानदार आर्थिक संकटात सापडला होता.
भिक्षूचे म्हणणे आहे की, जिंकलेले पैसे देवदूतांचे आहेत आणि त्यामुळे त्यांना ते स्वतःसाठी ठेवायचे नव्हते. त्यामुळे लॉटरीत जिंकलेले पैसे इतरांना वाटून देण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी हजारो स्थानिक लोकांना 200-200 baht (500-550 रुपये) दान करण्यास सुरुवात केली. रिपोर्टनुसार, पैसे देण्याच्या घोषणेनंतर भिक्षुंजवळ लोकांची रांग लागली होती. हजारो लोक मंदिरात येऊ लागले. आता परिस्थिती अशी आहे की प्रांताधिकारी गर्दीवर लक्ष ठेवत आहेत आणि गर्दीत कोविड नियम पाळायलाही मिळत आहेत. भिक्षुने आतापर्यंत परिसरातील स्थानिक लोकांना एकूण 1.5 मिलियन baht (34 लाख) दान केले आहे. तसेच, त्यांचे म्हणाले की, सर्व पैसे (4 कोटी) दान स्वरूपात देईल.
भिक्षु फनोम यांनी थाई मीडियाला सांगितले की, देवदूतांनी लॉटरी जिंकण्यासाठी आणि लोकांना मदत करण्यासाठी आशीर्वाद दिला. कारण ते 10 वर्षांपासून मंदिराची देखभाल करत आहेत. त्यांनी सांगितले की. लॉटरीच्या सोडतीच्या तीन दिवस आधी त्याने 061905 क्रमांकाची तीन लॉटरीची तिकिटे आणली होती. विक्रेत्याने स्वतः त्याला लॉटरीचे तिकीट खरेदी करण्यास मदत करण्यास सांगितले होते. दरम्यान, बौद्ध भिक्षुने लॉटरी जिंकण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी वेळोवेळी थाई मीडियामध्ये भिक्षूंनी लॉटरी जिंकल्याच्या बातम्या येत आहेत. एवढी मोठी रक्कम दान केल्याबद्दल सध्या लोक या बौद्ध भिक्षुचे कौतुक करत आहेत.