माकडांनी वकिलाच्या हातातून एक लाख हिसकावले अन् पाडला पैशांचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 04:05 PM2021-09-17T16:05:01+5:302021-09-18T16:34:33+5:30

monkey climbed on tree with a bag full of one lakh rupees in rampur : या माकडांनी शाहबादमधील वकील विनोद बाबू यांच्या हातातून एक लाख रुपयांच्या नोटांनी भरलेली बॅग घेऊन पळ काढला.

monkey climbed on tree with a bag full of one lakh rupees in rampur | माकडांनी वकिलाच्या हातातून एक लाख हिसकावले अन् पाडला पैशांचा पाऊस

माकडांनी वकिलाच्या हातातून एक लाख हिसकावले अन् पाडला पैशांचा पाऊस

googlenewsNext

रामपूर : माकडांची मस्ती तुम्हीही पाहिलीच असेल? अनेकदा माकडे घरावर सुकायला ठेवलेले कपडे घेऊन जातात तर कधी चपला घेऊन जातात, असाच माकडांचा एक कारनामा समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील रामपूरच्या शाहबाद शहरात माकडांनी झाडावरून पैशांचा पाऊस पाडल्याची घटना समोर आली आहे. (monkey climbed on tree with a bag full of one lakh rupees in rampur)

या माकडांनी शाहबादमधील वकील विनोद बाबू यांच्या हातातून एक लाख रुपयांच्या नोटांनी भरलेली बॅग घेऊन पळ काढला. यानंतर यामधील एक माकड प्रत्येकी पाचशे रुपयांचे दोन गठ्ठे घेऊन झाडावर चढले. एक बंडल माकडाने खाली फेकला आणि दुसरा बंडल घेऊन झाडावर चढले. त्यानंतर नोटा काढून खाली फेकू लागले. यावेळी 500-500 रुपयांच्या नोटांचा पाऊस पाहून आजूबाजूला सगळा गोंधळच उडाला.

तहसील आवारात हे दृश्य पाहून लोक झाडाखाली जमले आणि माकडांकडून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करू लागले. माकड झाडावर बसून पैशाचा पाऊस पाडत राहिला. जेव्हा सर्व रुपये खाली पडले तेव्हा सर्व नोटा जमा झाल्या. मोजणी झाली, 8500 रुपये कमी आढळले. वकील विनोद बाबू यांचा मुलगा आशिष वशिष्ठ यांनी यासंदर्भात माहिती दिली. 

वडील शाहबाद तहसीलमधील बारचे वरिष्ठ वकील आहेत. आज वडील मधुकर शाखेत गेले होते. त्यांना साविया कला शाखेत एक लाख रुपये जमा करायते होते. त्यामुळे ते परत येत असताना काही काळ तहसीलमध्ये थांबले. कोणीतरी तहसीलच्या गेटवर माकडांसाठी अन्न ठेवले होते. यावेळी बरीच माकडे जमा झाली होती आणि या माकडांनी वडिलांच्या हातातून पैशाची पिशवी घेतली, असे आशिष वशिष्ठ म्हणाले. 

तसेच, माकडांनी झाडावरून खाली टाकलेले पैसे येथील उपस्थित लोकांच्या आणि वकिलाच्या मदतीने गोळा करण्यात आले. त्यापैकी 17 नोटा मिळाल्या नाहीत. मात्र, मला सर्व वकील आणि लोकांचे आभार मानायचे आहेत, ज्यांच्या मदतीने पैसे गोळा झाले, असेही आशिष वशिष्ठ यांनी सांगितले. दरम्यान, माकडांमुळे गंभीर जखमी होण्याच्या घटना सामान्य झाल्या आहेत. पण आता त्यांच्या वाढत्या कृत्यांमुळे लोकांचे जीवन संकटात आले आहे.

Web Title: monkey climbed on tree with a bag full of one lakh rupees in rampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.