तुमच्या 'चांदणी'ला भेट द्या खराखुरा चंद्र; लिलाव लवकरच...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 01:38 PM2018-10-12T13:38:14+5:302018-10-12T13:48:16+5:30
अनेक प्रियकर हे आपल्या प्रेयसीला चंद्र तारे आणून देण्याबाबत बोलत असतात. अशांसाठी एक चांगली संधी चालून आली आहे. त्यात पूर्ण चंद्र तर नाही पण तुम्ही तुमच्या प्रेयसीला चंद्राचा तुकडा नक्कीच देऊ शकाल.
अनेक प्रियकर हे आपल्या प्रेयसीला चंद्र तारे आणून देण्याबाबत बोलत असतात. अशांसाठी एक चांगली संधी चालून आली आहे. त्यात पूर्ण चंद्र तर नाही पण तुम्ही तुमच्या प्रेयसीला चंद्राचा तुकडा नक्कीच देऊ शकाल. एका कंपनीने चंद्राचा तुकडा विकायला काढला आहे.
हा तुकडा १२ पाऊंड(५.५ किलो) वजनाचा आहे. हा तुकडा २०१७ मध्ये आफ्रिकेतील मौरितानियामध्ये वैज्ञानिकांनी शोधला होता. बॉस्टनच्या 'आरआर ऑक्शन कंपनी' चंद्राच्या या तुकड्याचा ५ लाख अमेरिकन डॉलर(साधारण ४ कोटी रुपये) किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीत लिलाव करत आहे. १८ ऑक्टोबरला यावर बोली लावली जाणार आहे.
चंद्राचा सर्वात मोठा तुकडा
चंद्राचा तुकडा म्हणजेच लूनर मीटिऑरायटचा लिलाव करणाऱ्या कंपनीचं म्हणनं आहे की, 'जगभरात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या उल्कापिंडांमध्ये हा सर्वात महत्त्वपूर्ण आहे. कारण हा चंद्राचा आतापर्यंतचा सर्वात मोठा तुकडा आहे. या दगडाला एनडब्लूए ११७८९ हे नाव देण्यात आलं आहे. तसेच याला बुआगाबा नावानेही ओळखले जाते.
(Image Credit : www.foxnews.com)
हजारो वर्षांपूर्वी जमिनीवर पडला होता हा तुकडा
असे सांगितले जात आहे की, लूनर मीटिऑराइट हजारो वर्षांपूर्वी जमिनीवर पडला होता. हा तुकडा सहा खंडांनी मिळून तयार झाला आहे. याती सर्वात मोठ्या तुकड्याचं वजन साधारण ६ पाऊंड इतकं आहे.
अक्रोडसारखा असतो यांचा आकार
मीडिया रिपोर्टनुसार, चंद्रातून निघालेल्या जास्तीत जास्त मिटिऑराईट(उल्कापिंड)चा आकार अक्रोड किंवा गोल्फच्या बॉल इतका असतो. मीटिऑर विकणारी कंपनी एअरोलाइट मटियोराइट्सचे सीईओ जियॉफ नोटकिन म्हणाले की, 'हा तुकडा पाहता क्षणीच हे कळाले होते की, हा खास आहे. हा आयुष्यभर शोधल्यानंतर एकदा मिळणाऱ्या वस्तूसारखं आहे'.
कुणीही खरेदी करु शकतं
हा उल्कापिंड कोणत्याही म्युझिअमसाठी अमुल्य ठरु शकतो. आरआरचे कार्यकारी उपाध्यक्ष रॉबर्ट लिविंगस्टोन म्हणाले की, 'खाजगी रुपाने कोणत्याही व्यक्तीला चंद्राचा हा तुकडा विकत घेण्याची संधी आहे. कारण अंतराळातून जे तुकडे आणले जातात, ते अमेरिकेची संपत्ती आहेत'.