बाबो! एका दिवसात मानवी मेंदूत येतात 'इतके' विचार, किती ते वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 12:53 PM2020-07-20T12:53:00+5:302020-07-20T12:55:11+5:30
सिनेमा बघण्यादरम्यान वैज्ञानिकांनी सहभागी लोकांची मॅग्नेटिक रेसोनेंस इमेजिंग केली. ही टेक्नीक मेंदूचा रक्तप्रवाह मोजून त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवते.
मनुष्याचा मेंदू हा एक फारच विचित्र मशीन असल्याचं बोललं जातं. मानवी मेंदूसंबंधी तथ्य वाचून लोक, तज्ज्ञ हैराण होतात. एका व्यक्तीच्या मेंदूमध्ये दररोज सरासरी ६ हजारांपेक्षा जास्त विचार येतात. या गोष्टीचा खुलासा नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून झालाय. वैज्ञानिकांनी एक अशी पद्धत विकसित केली आहे, जी विचार येण्याचा आणि संपण्याचा संकेत देऊ शकते.
वैज्ञानिकांनी विकसित केलेल्या या पद्धतीवरून हे जाणून घेता येऊ शकतं की, एक व्यक्तीच्या मेंदूत किती विचार येतात. ही पद्धत व्यक्तीला जेव्हा जेव्हा विचार येतो त्या क्षणाची नोंद ठेवते. या नव्या पद्धतीला शॉर्ट वॉर्म म्हटलं जातं.
वैज्ञानिकांनी सांगितले की, एखाद्या व्यक्तीच्या विचारांना मोजून त्याच्या व्यक्तिमत्वाबाबत जाणून घेता येऊ शकतं. जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात एखादा नवा विचार आला तर ते एक शॉर्ट वार्म बनवतात. वैज्ञानिकांच्या टीममधील सदस्य पोपपेंक म्हणाले की, जेव्हा लोक सिनेमा बघतात, तेव्हा शॉर्ट वॉर्म पूर्णपणे नवीन घटनांप्रमाणे मेंदूत उपजतात. विचारांमध्ये परिवर्तन होताच, एक नवीन शॉर्ट वॉर्म मेंदूत वाढू लागतो.
पोपपेंक आणि त्यांच्या टीमने अंदाज लावला की, एका व्यक्तीच्या मेंदूमध्ये रोज सरासरी ६२०० विचार येतात. यासाठी त्यांनी १८४ सहभागी लोकांना सिनेमा दाखवून विचारांबाबत रिसर्च केला. सिनेमा दाखवण्यादरम्यान सहभागी लोकांना तीन आणि चार ऑडिओ क्लिपनंतर २० सेकंदासाठी आराम दिला गेला. आराम केल्यावर त्यांना पुन्हा एक ८४ सेकंदाची क्लिप दाखवण्यात आली.
सिनेमा बघण्यादरम्यान वैज्ञानिकांनी सहभागी लोकांची मॅग्नेटिक रेसोनेंस इमेजिंग केली. ही टेक्नीक मेंदूचा रक्तप्रवाह मोजून त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवते. या नव्या टेक्नीकमुळे लोक काय विचार करत आहेत, याऐवजी लोक कधी विचार करत आहेत हे मोजण्यासाठी नवीन पद्धत विकसित करण्यात आली.
Video : लाइव्ह शो सुरू असताना अचानक निघाला महिला Anchor चा दात, बघा पुढे काय झालं....