Baba Vanga Predictions: 100 वर्षांहून अधिक आयुष्य, रात्र होणारच नाही...; बाबा वेंगांची भाकितं वाढवतायत जगाच टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 06:42 PM2022-08-22T18:42:45+5:302022-08-22T18:47:42+5:30

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार 5079 मध्ये जगाचा अंत होईल. याशिवाय बाबा वेंगा यांनी 2022 साठी दोन भाकिते वर्तवली आहेत.

More than 100 years of life the night will not happen Baba Venga's predictions increase the tension of the world | Baba Vanga Predictions: 100 वर्षांहून अधिक आयुष्य, रात्र होणारच नाही...; बाबा वेंगांची भाकितं वाढवतायत जगाच टेन्शन

Baba Vanga Predictions: 100 वर्षांहून अधिक आयुष्य, रात्र होणारच नाही...; बाबा वेंगांची भाकितं वाढवतायत जगाच टेन्शन

Next

साधारणपणे गेल्या 111 वर्षांपूर्वी बल्गेरियामध्ये जन्मलेल्या बाबा वेंगा यांनी अनेक भाकिते केली आहेत. त्यांनी केलेले अनेक भाकीतं आजवर खरी ठरली आहेत. वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षीच बाबा वेंगा यांची दृष्टी गेली होती. मात्र, त्यांच्या भाकितांमुळे अथवा भविष्यवाणींमुळे त्यांना जगभरात एव विशेष ओळख मिळाली.

आपल्या मृत्यूपूर्वी बाबा वेंगा यांनी 2022 आणि या पुढील काळासाठीही अनेक महत्वाची भाकिते केली आहेत. यात, 2100 मध्ये पृथ्वीवर रात्रच नसेल. कारण, कृत्रिम सूर्यप्रकाशामुळे पृथ्वी प्रकाशमय राहील. या भविष्यवाणीचाही समावेश आहे. तर जाणून घेऊयात बाबा वेंगा यांची काही खास भाकिते...

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, 2023 मध्ये पृथ्वीची कक्षा बदलेल आणि 2028 मध्ये अंतराळवीर शुक्रावर जातील. तसेच, 2046 मध्ये लोक अंग प्रत्यारोपणाच्या मदतीने 100 वर्षांहून अधिक काळ जगू शकतील, असे भाकितही बाबा वेंगा यांनी केले आहे.

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार 5079 मध्ये जगाचा अंत होईल. याशिवाय बाबा वेंगा यांनी 2022 साठी दोन भाकिते वर्तवली आहेत. यांपैकी, आशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या काही भागांत पूर येईल. हे भाकीत सत्य ठरले आहे. कारण या वर्षात देशात जबरदस्त पाऊस झाला होता आणि पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. आशियात बांगलादेश, उत्तर पूर्व भारत आणि थायलँडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती.

दुसऱ्या भाकितात बाबा वेंगा यांनी म्हटले होते, दुष्काळामुळे काही शहरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. त्यांचे हे भाकितही सत्य सिद्ध झाले. कारण पोर्तगालने आपल्या नागरिकांना पाण्याचा वापर मर्यादित करण्यास सांगितले आहे. याशिवाय, इटलीलाही 1950 च्या दशकानंतर सर्वात खराब दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. 

Web Title: More than 100 years of life the night will not happen Baba Venga's predictions increase the tension of the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.