जगातील सगळ्यात सुंदर राणी माहित्येय का? सुंदर दिसण्यासाठी करायची 'असा' भन्नाट जुगाड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2020 04:57 PM2020-11-29T16:57:44+5:302020-11-29T17:03:38+5:30
Hatke News in Marathi : एक राणी अशी होती जी सुंदर दिसण्यासाठी गाढवाच्या दुधाचा वापर करत होती. या राणीसाठी रोज ७०० गाढवीणींचे दूध मागवलं जात होतं.
इतिहासात अनेक राजकुमारी आणि राण्यांच्या कहाण्या ऐकायला मिळतात. ज्या आपल्या सौंदर्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. तुमचा विश्वास बसणार नाही पण या राण्या आपल्या सुंदरतेसाठी आणि आकर्षक दिसण्यासाठी वेगवेगळ्याचे प्रयत्न करत होत्या. अनेकजण पाण्यासह गाय आणि म्हशीच्या दुधाने अंघोळ करतात असं तुम्ही ऐकलं असेल. एक राणी अशी होती जी सुंदर दिसण्यासाठी गाढवाच्या दुधाचा वापर करत होती. या राणीसाठी रोज ७०० गाढवीणींचे दूध मागवलं जात होतं. ही राणी आपल्या सुंदरतेसाठीच नाही तर रहस्यमय जीवनासाठीही खूप प्रसिद्ध होती.
मिस्रची राजकुमारी क्लियोपेट्राला सुंदरतेची देवीसुद्धा म्हटलं जातं. या राणीचे जीवन हे खूपच रहस्यमय असून. संशोधकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. क्लियोपेट्रा जितकी सुंदर होती तितकीच षड्यंत्रकारीसुद्धा होती. वडिलांच्या मृत्यूनंतर १५ वर्षाच्या आयुष्यात क्लियोपेट्रा आणि तिचा भाऊ टोलेमी दियोनिसस यांना संयुक्त स्वरूपात राज्य प्राप्त झाले होते.
भावाला क्लियोपेट्राची सत्ता सहन झाल्याने क्लियोपैट्राला सीरियामध्ये शरण जावे लागले. पण या राजकुमारीने साहस सोडले नाही. रोमचा शासनकर्ता जूलियस सीजरला आपल्या मोहात पाडून क्लियोपेट्राने मिस्त्रवर हल्ला केला. टोलेमीला मारून राज सिंहासनावर हक्का दाखवला. ही राणी इतकी सुंदर होती की, राजे , सैन्य आणि अधिकारीवर्गाला आपल्या जाळ्यात अडकवून सगळी कामं करून घेत होती. जगभरातील १२ पेक्षा जास्त भाषांचे तिला ज्ञान होते. वाह, नशिब चमकलं! भारताच्या 'या' गावात सापडलं हिऱ्याचं भांडार; अन् लोकांना कळताच.....
सुंदर दिसण्यासाठी क्लियोपेट्रा दररोज ७०० गाढवं मागवून अंघोळ करायची. ज्यामुळे तिची त्वचा नेहमीच सुंदर राहिली. अलीकडील संशोधनातही हे सिद्ध झाले आहे. तुर्कीमध्ये केलेल्या अभ्यासानुसार एका संशोधनाच्या वेळी जेव्हा उंदीरांना गाई व गाढवीणीचे दूध दिले जात असे, तेव्हा गायीचे दूध पिणारे उंदीर अधिक चरबीयुक्त दिसत होते. या राणीचा मृत्यू अजूनही रहस्यमय आहे. सापाने दंश केल्यामुळे ही राणी मेल्याचे अनेक ठिकाणी बोल्लं जात होते. लय भारी! माय लेकाची बातच न्यारी, पत्नी किंवा प्रेयसी नाही तर आईसोबत करतोय परदेशवारी