इतिहासातील सर्वात डेंजर महिला स्नायपर, हिटलरच्या सैनिकांची उडवली होती तिने झोप!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 04:36 PM2020-02-06T16:36:09+5:302020-02-06T16:42:26+5:30

इतिहास या महिलेला चांगलाच ओळखतो. ही महिला इतिहासातील सर्वात खतरनाक महिला शूटर(स्नाइपर) मानली जाते.

Most dangerous female sniper in history Lyudmila Pavlichenko, Who killed 309 soldiers of hitler army | इतिहासातील सर्वात डेंजर महिला स्नायपर, हिटलरच्या सैनिकांची उडवली होती तिने झोप!

इतिहासातील सर्वात डेंजर महिला स्नायपर, हिटलरच्या सैनिकांची उडवली होती तिने झोप!

Next

(Image Credit : businessinsider.in)

ल्यूडमिला पवलिचेंको हे नाव तुम्ही कधी ऐकलं नसेल. पण इतिहास या महिलेला चांगलाच ओळखतो. ही महिला इतिहासातील सर्वात खतरनाक महिला शूटर(स्नाइपर) मानली जाते. ही इतकी शार्प होती की, तिने जर्मनीचा हुकूमशहा हिटलरच्या नाझी सेनेच्या नाकी नऊ आणले होते. या महिलेला सोव्हिएत संघात हिरो म्हणून ओळखलं जात होतं.

ल्यूडमिला द्वितीय महायुद्धावेळी सोव्हिएत संघाच्या रेड आर्मीमध्ये एक जबरदस्त स्नाइपर होती. महत्वाची बाब म्हणजे त्यावेळी महिलांना आर्मीमध्ये घेतलं जात नव्हतं. पण  ल्यूडमिलाने आपल्या खासियतच्या जोरावर सोव्हिएत संघातच नाही तर जगभरात नाव कमावलं.

(Image Credit : businessinsider.in)

असे सांगितले जाते की, केवळ २५ वर्षांची असताना ल्यूडमिलाने तिच्या स्नायपर रायफलने तब्बल ३०९ लोकांचा जीव घेतला होता. यातील जास्तीत जास्त लोक हे हिटलरचे सैनिक होते. स्नायपर रायफलसोबत अविश्वसनीय क्षमतेमुळे ल्यूडमिलाला 'लेडी डेथ' नावाने ओळखले जायचे.

(Image Credit : businessinsider.in)

१२ जुलै १९१६ ला यूक्रेनच्या एका गावात जन्मलेली ल्यूडमिलाने केवळ १४ व्या वयात शस्त्र हाती घेतली होती. हेन्री साकेडा यांच्या 'हिरोइन्स ऑफ द सोव्हिएत यूनियन' पुस्तकानुसार, ल्यूडमिला ही आधी शस्त्रास्त्रांच्या फॅक्टरीमध्ये काम करत होती. पण नंतर एका पुरूषांमुळे ती स्नायपर झाली.

(Image Credit : businessinsider.in)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिका दौऱ्यादरम्यान ल्यूडमिलाने एकदा सांगितले होते की, 'माझ्या शेजारी राहणारा एक मुलगा शूटिंग शिकत होता आणि तेव्हाच मी ठरवलं की, मलाही शूटिंग करायचं आहे. यासाठी मी भरपूर मेहनत घेतली'. याच मेहनतीचा परिणाम म्हणजे तिने शस्त्र चालवण्यात महारात मिळवली.

(Image Credit : Social Media)

नंतर १९४२ मध्ये युद्धादरम्या ल्यूडमिला बरीच जखमी झाली होती. त्यानंतर तिला रशियाची राजधानी मॉस्कोला पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर तिने दुसऱ्या स्नायपर्सना ट्रेनिंग देणं सुरू केलं. तसेच नंतर रेड आर्मीची प्रवक्ता देखील झाली होती. १९४५ मध्ये युद्ध संपल्यावर तिने सोव्हिएत नौसेनेच्या मुख्यालयातही काम केलं. १० ऑक्टोबर १९७४ ला ५८व्या वर्षी मॉस्कोत तिचं निधन झालं.


Web Title: Most dangerous female sniper in history Lyudmila Pavlichenko, Who killed 309 soldiers of hitler army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.