बाप रे बाप! 'हा' आहे जगातला सर्वात महाग आणि जुना कंडोम, किंमत वाचून व्हाल हैराण....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 11:21 AM2021-01-09T11:21:39+5:302021-01-09T11:25:34+5:30
जगातली कंडोमची निर्मिती करणारी सर्वात मोठी कंपनी Karex Bhd बंद झाली आहे. ही कंपनी ड्यूरेक्स ब्रॅन्डचे कंडोम तयार करते. आता ही कंपनी बंद पडल्याने जगात १० कोटी कंडोमची कमतरता भासत आहे.
कोरोना महामारीने काही काळासाठी जगाला ब्रेक लावला होता. कोविड-१९ पासून बचावासाठी प्रत्येकजण आपल्या घरात बसून होते. दरम्यान कोरोना काळात कंडोमची डिमांड इतकी वाढली होती की, जगभरात याची कमतरता भासत होती. कंडोमची कमतरता भासण्याचं आणखी एक कारण म्हणजे जगातली कंडोमची निर्मिती करणारी सर्वात मोठी कंपनी Karex Bhd बंद झाली आहे. ही कंपनी ड्यूरेक्स ब्रॅन्डचे कंडोम तयार करते. आता ही कंपनी बंद पडल्याने जगात १० कोटी कंडोमची कमतरता भासत आहे.
जगातला सर्वात जुना आणि महाग कंडोम
सध्या बाजारात स्वस्त दरात कंडोम मिळतात. गर्भधारणा टाळण्यासाठी आणि सुरक्षित लैंगिक संबंधासाठी यांचा वापर केला जातो. आज आम्ही तुम्हाला जगातल्या सर्वात महाग कंडोमबाबत सांगणार आहोत. या कंडोमच्या किंमतीत तुम्ही एक आयफोन खरेदी करू शकता.
किती आहे किंमत?
फोटोत जो कंडोम तुम्ही बघितला तो जगातला सर्वात जुना आणि महाग कंडोम आहे. हा कंडोम तब्बल २०० वर्षे जुना आहे. हा कंडोम लिलावात साधारण ४२ हजार ५०० रूपयांना खरेदी करण्यात आला होता.
कुठे मिळाला हा कंडोम
२०० वर्षे जुना हा कंडोम स्पेनच्या एका शहरात बंद बॉक्समध्ये सापडला होता. नंतर रिसर्चमधून समोर आले की, हा कंडोम २०० वर्षे जुना आहे. त्यानंतर कंडोमचा लिलाव करण्यात आला होता. हा कंडोम एन्सडर्म नावाच्या व्यक्तीने ४२ हजार ५०० रूपयांना खरेदी केला होता. त्यानंतर याला जगातील सर्वात महाग कंडोमचा दर्जा मिळाला.
कशापासून केला होता तयार?
या कंडोमची लांबी १९ सेमी आहे. २०० वर्षांपूर्वी श्रीमंत लोक अशाप्रकारच्या कंडोमचा वापर करत होते. हा कंडोम शेळीच्या आतड्यांपासून तयार करण्यात आला होता. हा कंडोम तयार करण्यासाठी वेळ बराच लागत होता. नंतर १९व्या शतकात रबराचे कंडोम येणं सुरू झाले.