देशातील सगळ्यात महागडा फ्लॅट मुंबईत, किंमत वाचाल तर डोकं चक्रावून जाईल!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 03:16 PM2023-04-04T15:16:29+5:302023-04-04T15:17:26+5:30
Most expensive apartment : आज देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये एकापेक्षा एका आलिशान फ्लॅट आहेत. हे फ्लॅट सेव्हन स्टार हॉटेलपेक्षा कमी नसतात. अशाच एका फ्लॅटबाबत आम्ही सांगत आहोत.
Most expensive apartment : श्रीमंत लोकांची मोठ्या बंगल्यांमध्ये राहण्याची परंपरा जुनी आहे. जगातले सगळेच श्रीमंत लोक अशा बंगल्यांमध्ये राहतात ज्याची कल्पना सामान्य माणूस कधीच करू शकत नाही. आधी आलिशान बंगल्यांचा ट्रेंड होता, आता तो आलिशान फ्लॅट्स असाही झाला आहे. आज देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये एकापेक्षा एका आलिशान फ्लॅट आहेत. हे फ्लॅट सेव्हन स्टार हॉटेलपेक्षा कमी नसतात. अशाच एका फ्लॅटबाबत आम्ही सांगत आहोत.
काही दिवसांआधी देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये देशातील सगळ्यात महागडा फ्लॅट विकला गेला आहे. हा फ्लॅट 369 कोटी रूपयांना देशातील उद्योगपती जेपी तापडिया यांनी खरेदी केला. दक्षिणी मुंबईच्या मालाबार हिल्सवर हा फ्लॅट आहे. इथे एका सी-फेसींग अपार्टमेंट आहे. एका रिपोर्टनुसार, लोढ़ा समूहाची कंपनी मॅक्रोटेक डेवलपर्सने या अपार्टमेंटचं निर्माण केलं आहे. तपाड़िया यांनी याच लोढा मालाबार सुपर लक्झरी रेसिडेंशियल टॉवरमध्ये 26, 27 आणि 28व्या मजल्यावर ट्रिप्लेक्स खरेदी केलाय. हा पूर्ण टॉवर 1.08 एकरमध्ये आहे. इथून समुद्राचा सुंदर नजारा दिसतो.
हा ट्रिप्लेक्स फ्लॅट एकूण 27,160 स्क्वेअर फूटात आहे. सामान्यपणे 2 बीएचके फ्लॅट एक हजार स्क्वेअर फूटात असतो. अशात या लक्झरी ट्रिप्लेक्समध्ये 27 पेक्षा जास्त 2 बीएचके तयार होतील. यावरून याच्या साइज अंदाज लावता येईल. रिपोर्टनुसार, या ट्रिप्लेक्सच्या रजिस्ट्रीवर तपाड़िया परिवाराने 19.07 कोटी रूपयांची स्टॅंप ड्यूटी दिली आहे.
बजाज परिवाराने खरेदी केला ट्रिप्लेक्स
याच टॉवरमध्ये देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि बजाज ऑटोचे चेअरमन नीरज बजाज यांनी सुद्धा 29, 30 आणि 31व्या मजल्यावर ट्रिप्लेक्स 252.5 कोटी रूपयांना खरेदी केला. हा फ्लॅट एकूण 18008 स्क्वेअर फूटात आहे. त्यांना या ट्रिप्लेक्ससोबत आठ कारची पार्किंग सुद्धा मिळाली आहे.