अरे बाप रे बाप! या वळूच्या सीमेनला मिळाली रेकॉर्ड ब्रेक किंमत, आकडा वाचून बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 12:55 PM2023-02-08T12:55:14+5:302023-02-08T12:57:24+5:30

Most Expensive Bull Semen : रिपोर्ट्समध्ये हा दावा करण्यात आला आहे की, वळूच्या सीमेनवर लावण्यात आलेली ही आतापर्यंतची सगळ्या मोठी बोली आहे. सध्या या वळूची जोरदार चर्चा रंगली आहे.

Most expensive bull semen at auction collects 20 lakh rupees in Australia | अरे बाप रे बाप! या वळूच्या सीमेनला मिळाली रेकॉर्ड ब्रेक किंमत, आकडा वाचून बसेल धक्का!

अरे बाप रे बाप! या वळूच्या सीमेनला मिळाली रेकॉर्ड ब्रेक किंमत, आकडा वाचून बसेल धक्का!

Next

Most Expensive Bull Semen : तशी वळूंच्या सीमेनची म्हणजे स्पर्मची किंमत खूप असते आणि ते खूप महागडे विकले जातात. पण ऑस्ट्रेलियातील एका वळूने किंमतीचा रेकॉर्ड तोडला आहे. इथे एका वळूच्या सीमेनची बोली 20 लाख रूपये लावण्यात आली. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये हा दावा करण्यात आला आहे की, वळूच्या सीमेनवर लावण्यात आलेली ही आतापर्यंतची सगळ्या मोठी बोली आहे. सध्या या वळूची जोरदार चर्चा रंगली आहे.

हा वळू ऑस्ट्रेलियातील एका पशुपालकाकडे आहे. एबीसी न्यूजच्या एका रिपोर्टनुसार, या वळूच्या सीमेनचा लिलाव क्‍वींसलॅंडमध्ये करण्यात आला. पशुपालकांमध्ये त्याचं सीमेन खरेदी करण्यासाठी स्पर्धा रंगली होती. याचं कारण हे होतं की, या सीमेनच्या माध्यमातून इतर पशुंचं जेनेटिक्स आणखी चांगलं होईल. या वळूचं सीमेन पाम प्रिचर्ड नावाच्या पशुपालकाने वीस लाख रूपयांमध्ये खरेदी केलं.

रिपोर्ट्सनुसार, हा वळू याआधीही चर्चेत आला होता. त्यावेळी हा वळू काही वर्षाआधी 2 कोटी 68 लाख रूपयांना खरेदी करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, या वळूला ब्रीडर कंपनी चालवणारे रोजर आणि लॉरेना जेफरीजने खरेदी केलं होतं. बरेच दिवस हा वळू आपल्या किंमतीमुळे चर्चेत होता. आता त्याच्या सीमेनने रेकॉर्ड कायम केला.

या सीमेनचा वापर इतर पशुंच्या जेनेटिक्सला अधिक चांगलं करण्यासाठी केला जातो. तेच या सीमेनचा वापर करून कमी दूध देणाऱ्या प्रजातींच्या गायींकडून चांगली वासरं जन्माला घातली जाऊ शकतात. 

Web Title: Most expensive bull semen at auction collects 20 lakh rupees in Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.