Most Expensive Currency: 'हे' आहे जगातील सर्वात महाग चलन, भारतीय रुपयापेक्षा कैक पटीने जास्त...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 17:23 IST2022-11-01T17:23:00+5:302022-11-01T17:23:41+5:30
Most Powerful Currency: अमेरिकन डॉलर नाही तर या देशाचे चलन जगातील सर्वात महाग चलन आहे.

Most Expensive Currency: 'हे' आहे जगातील सर्वात महाग चलन, भारतीय रुपयापेक्षा कैक पटीने जास्त...
Most Powerful Currency: तुम्हाला विचारलं की, जगातील सर्वात महाग आणि शक्तीशाली चलन कोणते? तर तुमचे उत्तर असेल अमेरिकन डॉलर. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अमेरिकन डॉलर आणि भारतीय रुपयावर केलेल्या वक्तव्यामुळे डॉलर पुन्हा चर्चेत आले आहे. पण, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, डॉलर जगातील सर्वात मोठे चलन नाही.
यामुळे कुवैती चलन महाग
तुम्ही विचार करत असाल की, आर्थिकदृष्ट्या जगातील सर्वात मोठा देश असलेल्या अमेरिकेच्या चलनापेक्षा, दुसरे कोणते चलन मोठे असेल. तर, कुवैत या देशाचे चलन असलेले दिनार, हे जगातील सर्वात शक्तिशाली चलन आहे. कुवैतमध्ये तेलाचा भरपूर साठा आहे आणि तेलाच्या वाढत्या मागणीमुळे कुवैती चलनाची मागणीही खूप जास्त आहे.
चलनाची किंमत किती
जिथे कुवैती दिनारची किंमत 265 रुपयांपेक्षा जास्त आहे, तिथे एका डॉलरची किंमत 82 रुपये आहे. मात्र, हा दर चढ-उतार होत राहतो. तरीही कुवैती दिनार आणि डॉलरमध्ये किती फरक आहे ते तुम्ही पाहू शकता. यावरून कुवेती दिनार भारतीय चलनाच्या तुलनेत किती मजबूत आहे याचा अंदाज लावता येतो.
ही सर्वात महाग चलने
कुवैती दिनार, बहरीनी दिनार, ओमानी रियाल, जॉर्डनियन दिनार आणि पाउंड स्टर्लिंग या जगातील पाच सर्वात महाग चलनांपैकी एक आहेत. हे सर्व जगातील सर्वात जुन्या चलनांपैकी एक आहेत. या सर्वांची किंमत अमेरिकन डॉलर आणि भारतीय रुपयांपेक्षा कितीतरी जास्त आहे.