जगातील सगळ्यात महाग धूळ, कोट्यावधी आहे याची किंमत; केवळ तीन देशांकडे आहे स्टॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 03:54 PM2023-11-25T15:54:48+5:302023-11-25T15:55:41+5:30
Most expensive dust : पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात सगळीकडे धुळच धूळ आहे त्यामुळे याला कुणी महत्व देत नाही.
Most expensive dust : लोक जेव्हा एखाद्याला कमी लेखतात तेव्हा असं नेहमीच म्हटलं जातं की, 'ते तर माझ्या पायाच्या धुळीच्या बरोबरीचेही नाही'. धुळीसोबत तुलना करण्याचा अर्थ होतो की, समोरच्या व्यक्तीला काहीच किंमत नाही. हे खरंही आहे कारण मातीच्या धुळीला काही किंमत नसते. भलेही ती तयार होण्याला लाखो वर्ष का लागले असेना. पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात सगळीकडे धुळच धूळ आहे त्यामुळे याला कुणी महत्व देत नाही. पण जर पृथ्वीवर धूळ राहिलीच नाही तर जीवन संकटात येऊ शकतं. ना धान्य उगवेल ना झाडी.
पण अनेकांना हे माहीत नसेल की, जगात अशीही धूळ आहे जी फार दुर्मीळ असते आणि याची किंमत सोन्यापेक्षाही जास्त असते. आज आम्ही तुम्हाला अशा धुळीबाबत सांगणार आहोत, जिची किंमत सगळ्यात जास्त आहे.
ही आहे जगातील सगळ्यात महाग धूळ
जगातील सगळ्यात महागडी धूळ पृथ्वीवर नाहीये. ती आहे चंद्रावर. चंद्रावरील चिमुटभर धुळीचा लिलाव न्यूयॉर्कच्या बोनहाम्समध्ये झाला होता. इथे या धुळीला तेव्हा साधारण 4 कोटी रूपयांपेक्षा जास्त किंमत मिळाली होती. हैराण करणारी बाब ही आहे की, लिलावाआधी या धुळीला 8 ते 12 लाख रूपये मिळतील असा अंदाज लावला होता.
ही तिच धूळ होती जी चंद्रावर उतरणारा पहिला व्यक्ती नील आर्मस्ट्रॉन्गने तिथे उतरल्यावर उचलली होती. अपोलो 11 अभियानाशी संबंधित असल्याने धूळ ऐतिहासिक किंमतीला विकली गेली. तरीही चंद्राच्या धुळीची किंमत आपल्यातच जास्त आहे. कारण आज ती केवळ दुर्मीळ नाहीतर जगात याची फार डिमांड आहे.
फक्त 3 देशांकडे आहे चंद्राची धूळ
चंद्राची धूळ महागडी असण्याचं कारण म्हणजे ती पृथ्वीवर आणणं सुद्धा फार जास्त खर्चीक आहे. केवळ तीन देशांकडेच चंद्रावरील धूळ आहे. अमेरिकेच्या नासा अपोलो अभियानांनी 382 किलो चंद्रावरील दगड आणि धुळीचे नमून जमा केले. तर सोव्हिएस संघाने आपल्या तीन मोहिमांमध्ये केवळ 300 ग्रॅम धूळचं जमा केली. तर चीनही चंद्रावरील धूळ जमिनीवर आणणाऱ्या देशांपैकी एक आहे. त्यांनी 3 किलो धुळीचे नमूने आणले होते.