अजब गजब झाडी! एक 300 वर्ष वाळत नाही, तर दुसरं उगवण्यास लागतात 8 वर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 03:38 PM2023-11-07T15:38:33+5:302023-11-07T15:39:15+5:30

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, काही झाडं अशीही आहेत ज्यांची किंमत खूप जास्त आहे. जे खरेदी करणं सामान्यांना जमणार नाही.

Most expensive plants one does not wither for 300 years another takes 8 years to grow | अजब गजब झाडी! एक 300 वर्ष वाळत नाही, तर दुसरं उगवण्यास लागतात 8 वर्ष

अजब गजब झाडी! एक 300 वर्ष वाळत नाही, तर दुसरं उगवण्यास लागतात 8 वर्ष

Most Expensive Plants in World: जगभरात अनेक महागड्या वस्तू मिळतात. जेव्हाही महागड्या वस्तूंबाबत बोललं जातं तेव्हा जास्तीत जास्त लोक सोनं, हिरे, मोती, घर आणि महागड्या कारचा उल्लेख होतो. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, काही झाडं अशीही आहेत ज्यांची किंमत खूप जास्त आहे. जे खरेदी करणं सामान्यांना जमणार नाही.

जगातल्या सगळ्यात महागड्या लाकडाबाबत तुम्ही ऐकलं असेल. आफ्रीकन ब्लॅकवुड ज्याची किंमत लाखो रूपये आहे. पण आज आम्ही तुम्हाला जगातल्या सगळ्यात महागड्या झाडांबाबत सांगणार आहोत. जर तुम्हाला यांची किंमत माहीत पडेल तर तुम्ही अवाक् व्हाल. कारण यांची किंमत लाखो ते कोट्यावधी रूपये आहे.

जगात सगळ्यात जास्त महागडं हे बोन्साय झाड आहे. जपानच्या एका समिटमध्ये याला 13 लाख डॉलर म्हणजे 10 कोटी रूपयांना विकलं गेलं होतं. हे झाड 800 वर्षापेक्षाही जुनं असल्याचं सांगितलं जातं. यांचं आयुष्य फार जास्त असतं. अनेक ट्री गार्डनमध्ये तुम्ही 300 ते 400 वर्ष जुनी बोन्साय झाडं बघू शकता. 

फिलोडेंड्रोन पिंक प्रिंसेसची किंमत 90 हजारांपेक्षा जास्त आहे. या झाडाला ब्लशिंग फिलोडेंड्रोन नावानेही ओळखलं जातं. हे दिसायला फारच सुंदर असतं. याची पाने हिरव्या आणि गुलाबी रंगाची असतात. ही झाडं चीनमध्ये उगवली जातात.

शेन्जेन नोंगके आर्किड जगातल्या सगळ्यात महागड्या झाडांपैकी एक आहे. हे झाड मानव निर्मित आहे. म्हणजे हे फूल चीनच्या अनेक अॅग्रीकल्चर साइंटिस्टने मिळून 8 वर्षात तयार केलं आहे. हे झाड 4 ते 5 वर्ष विकसित होत नाही आणि फार हळूहळू वाढतं. सुंदर दिसत असल्याने शोकेससाठी चांगलं मानलं जातं. याची किंमत 2 लाख डॉलर म्हणजे 10 कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे.

फिलोडेंड्रोन मिनिमा (Philodendron Minima) हेही एक फार महागडं झाड आहे. 2 वर्षाआधी न्यूझीलॅंडच्या एका स्टोरने हे 8,150 डॉलर म्हणजे 6 लाख रूपयांना विकलं होतं. या झाडाला 4 चमकदार पाने असतात. यात हिरवी, पिवळी पाने असतात. सामान्य फिलोडेंड्रोनची किंमत 1400 ते 2000 रूपये असते. 

Web Title: Most expensive plants one does not wither for 300 years another takes 8 years to grow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.