जगातल्या 8 अशा जागा जिथे जाण्यास कुणालाही नाही परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 03:13 PM2018-05-28T15:13:28+5:302018-05-28T15:13:28+5:30
जगात अशा अनेक जागा आहेत ज्यांच्याबाबत तुम्ही कधी ऐकलंही नसेल. या जागांवर जाण्यासाठी कुणालाही परवानगी दिली जात नाही.
जगात अशा अनेक जागा आहेत ज्यांच्याबाबत तुम्ही कधी ऐकलंही नसेल. या जागांवर जाण्यासाठी कुणालाही परवानगी दिली जात नाही. इतकेच काय तर यातील काही जागा अशा आहेत जिथे जाण्याची कुणाची हिंमतही होत नाही. यात अशाही काही जागा आहेत जिथे जाऊन तुमचा जीवही जाऊ शकतो. काही लोक या जागांवर गेले आणि कधी परतच आले नाहीत.
ही जागा अमेरिकेतील नेवादामध्ये असून इथे सर्वसामान्य लोकांच्या जाण्यावर बंदी आहे. काही थेअरीजनुसार, ही जागा अमेरिकन आर्मीने एलियन टेस्टींगसाठी तयार केली होती.
ही चीनच्या एका राजाची सेना आहे. हे सगळे सैनिक आपल्या राजाच्या सुरक्षेसाठी प्रतिबध्द होते. जेव्हा त्या राजाचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या समाधीमध्ये टेराकोटा वॉरिअर्सचे पुतळेही ठेवण्यात आले होते. या साईटवर सर्वसामान्यांना जाण्यास परवानगी नाहीये.
हे चित्र पाहून तुम्हाला ही एक तिजोरी आहे आणि यात मोठी रक्कम ठेवली असेल असं वाटत असेल. पण तसं नाहीये. कोका कोला हे ड्रिंक तयार करण्याची रेसिपी या 6.6 फूट तिजोरीमध्ये अटलांटामध्ये सुरक्षित केली आहे. या तिजोरीच्या सुरक्षेसाठी सतत गार्ड असतात.
ही फ्रान्समधील एक गुहा आहे. ही गुहा 20 हजार वर्ष जुनी असल्याचे सांगितले जाते. या गुहेत त्या काळातील अनेक पेंटींग सुस्थितीत आहेत. त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून या जागेवर कुणीही जाऊ शकत नाही.
या आयलंडला हार्ड आयलंडच्या नावाने ओळखले जाते. हे आयलंड ऑस्ट्रेलियामध्ये असून इथे लोकांना जाण्यास बंदी आहे.
ब्राझीलच्या Sao Paulo पासून 93 किमी अंतरावर Ilha da Queimada Granda नावाचं हे आयलंड आहे. या आयलंडवर प्रत्येक फूटावर साप आढळतात. येथे वेगवेगळ्या प्रकारचे विषारी साप आहेत. त्यामुळे इथे जाण्यास परवानगी नाही.
हे आहे इंग्लंडच्या राणीची रुम आहे. या रुममध्ये राजघराण्यातील लोकांनाही जाण्यास बंदी आहे. सर्वसामान्य तर दूरच राहिले.
या ठिकाणी ख्रिस्ती धर्मासंबंधी अनेक महत्वाची पुस्तके ठेवलेली आहेत. इथे कुणालाही जाण्यास परवानगी नाही. या जागेला व्हॅटिकन सीक्रेट आर्काईव्ह असे म्हटले जाते.