ऐकावं ते नवलच! 'या' गावाचं किचन भारतात तर बेडरूम दुसऱ्या देशात; जाणून घ्या, नेमकं कसं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 04:25 PM2022-09-06T16:25:47+5:302022-09-06T16:27:58+5:30

देशात एक असं गाव आहे जिथे किचन भारतात आहे आणि झोपण्यासाठी त्या गावातील लोक दुसऱ्या देशात जातात. ही बाब ऐकून आश्चर्य वाटेल.

most unusual village of india indian village with unique story you must visit name longwa | ऐकावं ते नवलच! 'या' गावाचं किचन भारतात तर बेडरूम दुसऱ्या देशात; जाणून घ्या, नेमकं कसं? 

फोटो - झी न्यूज

Next

भौगोलिक स्थिती पाहता देशातील काही गावांना शेवटचं गाव म्हणून दर्जा मिळाला आहे. भारतातील उत्तराखंडपासून (Uttarakhand) पुढे गेल्यास ईशान्य भारतात (North East) अशी अनेक गावं आहेत. या गावांबद्दल अनेकांनी ऐकलंही असेल. पण देशात एक असं गाव आहे जिथे किचन भारतात आहे आणि झोपण्यासाठी त्या गावातील लोक दुसऱ्या देशात जातात. ही बाब ऐकून आश्चर्य वाटेल. पण दोन देशांच्या सीमेवर हे गाव असल्याने अशी स्थिती निर्माण झाली आहे.

भारतातलं शेवटचं गाव

भारत आणि म्यानमार या दोन देशांच्या सीमेवरील लोंगवा गाव (Longwa Village) भौगोलिकदृष्ट्या सीमेवर आहे. त्यामुळे घराघरांमध्ये भारत-म्यानमारदरम्यान सीमा विभागली गेल्याचं पाहायला मिळतं. इथे एका देशातून दुसऱ्या देशात जायला पासपोर्टची (Passport) आवश्यकता भासत नाही. लोंगवा हे गाव नागालँडच्या मोन जिल्ह्यात येतं. दोन देशांत या गावाची अर्धी-अर्धी वाटणी केली गेली आहे. या गावाला भारताचं शेवटचं गाव म्हणूनही संबोधलं जातं.

किचन भारतात तर बेडरूम म्यानमारमध्ये 

इतर गावांप्रमाणे लोंगवा या गावाने त्यांच्या वैभवशाली इतिहासाची ओळख कायम ठेवली आहे. या गावातील लोक भारतात जेवण करतात आणि झोपण्यासाठी मात्र ते दुसऱ्या देशात जात असल्याचं बोललं जातं. यांच्या घरातून आंतरराष्ट्रीय सीमारेषा गेल्यामुळे अनेक लोकांचं किचन भारतात आहे. तर त्यांचे बेडरूम म्यानमारमध्ये येतं. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार, गावचा प्रमुख हा येथील राजा असतो. त्याला ‘अंघ’ असं संबोधलं जातं. जर अंघच्या घरात असाल तर एकाच वेळी तुम्ही म्यानमार व भारतात असल्याचं मानलं जातं. 

गावातील नागरिकांकडे दुहेरी नागरिकत्व 

या गावातील नागरिकांकडे दुहेरी नागरिकत्व आहे. भारतातील काही लोक शेती करण्यासाठी म्यानमारमध्ये जातात. तर काही म्यानमारमधील लोक शेती करण्यासाठी भारतात येतात. गावची प्रमुख व्यक्ती एखाद्या राजाप्रमाणे असते. या राजाला एक-दोन नव्हे अनेक पत्नी असू शकतात. या गावतील प्रमुखाचं नागालँडसह अरुणाचल प्रदेश आणि म्यानमारमध्ये 70 पेक्षा अधिक गावांत वर्चस्व आहे. याचाच अर्थ या गावच्या प्रमुखाचा आदेश दूरपर्यंत लागू असतो. या प्रमुखाला खूप मान, सन्मान दिला जातो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: most unusual village of india indian village with unique story you must visit name longwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.