अजबच! आई १७, तर आजी ३३, पणजी ५४ वर्षांची
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 09:05 AM2021-10-11T09:05:41+5:302021-10-11T09:06:09+5:30
मी वयाच्या ३३ व्या वर्षी तीन लेकरांची आई. मला कोणी आजी म्हणून हाक मारावी, असे मला सुरुवातीला वाटले नाही. परंतु, आता मला आजी शब्द ऐकायला आवडतो.
लंडन : मी वयाच्या ३३ व्या वर्षी तीन लेकरांची आई. मला कोणी आजी म्हणून हाक मारावी, असे मला सुरुवातीला वाटले नाही. परंतु, आता मला आजी शब्द ऐकायला आवडतो. माझे माझ्या नातीवर प्रेम असून, प्रत्येकाला वाटते की मी तिची आईच आहे, असे गेम्मा म्हणाल्या.
गेम्मा यांची आई ५४ वर्षांची आहे. ती पणजी झाली आहे. गेम्मा यांना मैझी (१७) हिच्यासह तीन मुली. ग्रेसी (१०) आणि बेल्ला ही सगळ्यात धाकटी. आता तीच मैझी हिच्या बाळाची चार वर्षांची मावशी झाली. गेम्मा म्हणाल्या, मी बाळाला या आठवड्यात शाळेत घेऊन गेले होते आणि कोणीतरी माझ्याकडे आले व बाळ तुमचे का? असे विचारले. मी म्हणाले की, ही माझी नात आहे. हे ऐकल्यावर त्यांना धक्काच बसला. प्रत्येकाला असे वाटले की, हे बाळ मैझीची बहीण आहे.
बाळाचे बारसेही
गेम्मा यांनी वयाच्या १६ व्या वर्षी २००४मध्ये मैझीला जन्म दिला. मैझी आणि तिचा मित्र जॅक विअर (१९) हे त्यांच्या बाळाला लारोसा माए या नावाने हाक मारतात.