आश्चर्य! कोरोना व्हायरसमुळे महिलेच्या दुधाचा रंग झाला हिरवा, डॉक्टरही झाले हैराण....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 03:38 PM2021-02-13T15:38:18+5:302021-02-13T15:46:30+5:30

(Corona Virus) मिरर वेबसाइटवर प्रकाशित वृत्तानुसार, २३ वर्षीय Anna Cortez ने नुकताच बाळाला जन्म दिला. याच्या काही दिवसांनंतर Anne ला कोरोनाची लागण झाली होती.

Mother breast milk turned neon green after corona infection at science | आश्चर्य! कोरोना व्हायरसमुळे महिलेच्या दुधाचा रंग झाला हिरवा, डॉक्टरही झाले हैराण....

आश्चर्य! कोरोना व्हायरसमुळे महिलेच्या दुधाचा रंग झाला हिरवा, डॉक्टरही झाले हैराण....

Next

कोरोना व्हायरसने(Corona Virus) संक्रमित एका महिलेने दावा केला आहे की, तिचं दूध (Breast Milk) कोविड-१९(Covid-19) च्या इन्फेक्शननंतर हिरव्या रंगाचं झालं आहे. कोरोनामुळे आईच्या दुधाचा रंग हिरवा होणं ही फार हैराण करणारी घटना आहे. या घटनेमुळे वैज्ञानिक आणि डॉक्टरही हैराण झाले आहेत. चला जाणून घेऊ काय आहे महिलेचा दावा...

मिरर वेबसाइटवर प्रकाशित वृत्तानुसार, २३ वर्षीय Anna Cortez ने नुकताच बाळाला जन्म दिला. याच्या काही दिवसांनंतर Anne ला कोरोनाची लागण झाली होती. सोबत तिच्या बाळालाही कोरोना झाला होता. या दरम्यान Anna च्या दुधाचा रंग हलका हिरवा झाला होता. मेक्सिकोच्या(Mexico) मॉन्टेरेमध्ये राहणारी Anna ने सांगितले की, डिलिवरीच्या काही दिवसांनंतर तिला कोरोनाची लागण झाली होती. यादरम्यान जेव्हा तिने तिच्या बाळाला दूध देण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या लक्षात आलं की, दुधाचा रंग हलका हिरवा झाला. हे पाहून ती थक्क झाली. (हे पण वाचा : सावधान! आता आपली स्वत:ची 'फौज' तयार करत आहे कोरोना व्हायरस, ३ नवे व्हेरिएंट जे आणू शकतात वादळ...)

Anna ने याबाबत डॉक्टरांना सांगितले. डॉक्टरांनी दोघांची कोरोनाची टेस्ट केली. समोर आले की, Anna च्या दुधामुळे बाळालाही कोरोनाची लागण झाली.  पण आता उपाचारानंतर Anna आणि तिचं बाळ सुखरूप आहे. तर तिच्या दुधाचा रंगही सामान्य झाला आहे.

कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्यावर दोन दिवसांनी Anna च्या दुधाचा रंग सामान्य झाला. Anna च्या डॉक्टरांनी सांगितले की, हे शक्य आहे की, दुधाचा रंग बदलेल. पण या घाबरण्यासारखं काही नाही. कारण आता Anna पूर्णपणे सुरक्षित आहे आणि तिच्या बाळासाठी तिचं दुधही.

डॉक्टरांनी सांगितले की, जेव्हा शरीरात अ‍ॅंटीबॉडीज संक्रमणासोबत लढतात तेव्हा अशाप्रकारच्या बदलाची शक्यता असते. यात दुधाचा रंग बदलणे शक्य आहे. पण हे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये होत असलेल्या सकारात्मक बदलांचा परिणाम आहे. 

डायटिशिअनचं मत आहे की, महिलेच्या खाण्या-पिण्यामुळे तिच्या दुधाचा रंग बदलला असेल. पण जेव्हा Anna Cortez म्हणाली की, तिने डॉक्टरांनी दिलेली डाएट फॉलो केली होती आणि आपल्या डाएटमध्ये काहीही बदल केला नव्हता. यानंतर डायटिशिअन हैराण झाले. 

जेव्हा Anna च्या आईने एक्सपर्टसोबत चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितले की, ही एक सामान्य प्रक्रिया आहे. जेव्हा आई आजारी होते किंवा बाळ आजारी पडतं किंवा दोन्ही आजारी पडतात. म्हणजे सर्दी-खोकला किंवा पोटात व्हायरसचं संक्रमण होतं तेव्हा आईच्या दुधाचा रंग बदलणं एक सामान्य प्रक्रिया आहे. हे शरीरात विकसीत होत असलेल्या अ‍ॅंटीबॉडीजमुळे होतं.

Web Title: Mother breast milk turned neon green after corona infection at science

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.