सासरी पोहोचताच सासूने केलं असं काही, नवरी म्हणाली - आयुष्यभर विसरणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 10:32 AM2023-03-07T10:32:56+5:302023-03-07T10:33:07+5:30

China Bride In Sasural: साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या एका रिपोर्टनुसार, ही घटना चीनच्या एका प्रांतातील आहे. नुकतंच एका महिलेचं लग्न झालं होतं आणि ती सासरी पोहोचली.

Mother in law forced bride for sweep home in very first morning in China | सासरी पोहोचताच सासूने केलं असं काही, नवरी म्हणाली - आयुष्यभर विसरणार नाही!

सासरी पोहोचताच सासूने केलं असं काही, नवरी म्हणाली - आयुष्यभर विसरणार नाही!

googlenewsNext

China Bride In Sasural: गेल्या काही दिवसांपासून चीनमधील लग्नाच्या रिती-रिवाजांचे किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नव्या नवरींना या अजब रिवाजांचा सामना करावा लागत आहे. अशीच एक घटना समोर आली ज्यात एक नवरी तिच्या सासूचं भरभरून कौतुक करत आहे. नवरी जेव्हा सासरी पोहोचली आणि सकाळी तिला सासूकडून सरप्राइज मिळालं.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या एका रिपोर्टनुसार, ही घटना चीनच्या एका प्रांतातील आहे. नुकतंच एका महिलेचं लग्न झालं होतं आणि ती सासरी पोहोचली. ज्या दिवशी ती सासरी गेली त्या दिवशी तिने काही काम केलं नाही. पण दुसऱ्या दिवशी सासू अचानक रूममध्ये आली आणि म्हणाली की, उद्या सकाळी दाराजवळ एक झाडू असेल. त्या झाडूने तुला पूर्ण घराची सफाई करायची आहे. त्याशिवाय सासू दुसरं काही सांगितलं नाही.

सासूचं हे बोलणं ऐकून नवरीला अजब वाटलं. त्यानंतर तिने विचार केला तर उद्या बघुया काय होतं. दुसऱ्या दिवशी तिने पाहिलं तर घर काही फार घाण झालं नव्हतं. पण झाडू त्याच ठिकाणी ठेवलेला होता. जसा तिने झाडू उचलला त्याखाली नोटांचे बंडल पडले होते. जे बघून ती हैराण झाली. 
नोटांच्या बंडलासोबत तिथे काही गिफ्टही ठेवले होते. ती आधी तर कन्फ्यूज झाली, पण नंतर इतकी खूश झाली की, तिने सासूला मिठी मारली. नंतर ती भावनिक झाली. हा एक स्थानिक रिवाज आहे. ज्यात लग्नाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी सासू आपल्या सूनेला सरप्राइज देते. सोशल मीडियावर नवरीने आपल्या सासूचं भरभरून कौतुक केलं आहे. 

Web Title: Mother in law forced bride for sweep home in very first morning in China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.