12 मुलांच्या आईला करायचंय तिसरं लग्न; आता शोधतेय 10 मुलांचा बाप, सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 12:36 PM2023-09-14T12:36:20+5:302023-09-14T12:37:18+5:30

12 मुलांची आई असलेल्या या महिलेला तिची मुलं कमी वाटत आहेत. 

mother of 12 children wants to remarry searching for man with 10 children told reason | 12 मुलांच्या आईला करायचंय तिसरं लग्न; आता शोधतेय 10 मुलांचा बाप, सांगितलं कारण

12 मुलांच्या आईला करायचंय तिसरं लग्न; आता शोधतेय 10 मुलांचा बाप, सांगितलं कारण

googlenewsNext

जगभरात वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी अनेक ठिकाणी छोटं कुटुंब- सुखी कुटुंब ही घोषणा दिली जाते. अनेक जण महागाई वाढल्याने फक्त एक किंवा दोन मुलांचाच विचार करतात. मात्र न्यूयॉर्कमधील एका महिलेला हे मान्य नाही. ती घरामध्ये असलेल्या मुलांच्या संख्येने संतुष्ट नाही. 12 मुलांची आई असलेल्या या महिलेला तिची मुलं कमी वाटत आहेत. 

वेरोनिकाने तिला सू रेडफोर्ड सारखं 22 मुलांच्या आईची बरोबरी करायची आहे. वेरोनिका मेरिटला पहिला मुलगा हा 14 व्या वर्षी झाला होता. 2021 मध्ये ती आपल्या दुसऱ्या पतीपासून वेगळी झाली. तिला आता असा पती हवा आहे जो कमीतकमी दहा मुलांचा बाप असेल. म्हणजे मुलांची एकूण संख्या 22 होईल.

12 मुलांच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, "मला आणि माझ्या मुलांना आता पती हवा असल्याने मी त्याचा शोध घेत आहे. मला असा नवरा हवाय ज्याला आधीच मुलं असतील. जर त्याला दहा मुलं असतील तर एक मोठं कुटुंब तयार होऊ शकतं आणि तेच अत्यंत योग्य असेल. मी अशा काही लोकांसोबत आधी राहत होती. ज्याच्यासोबत मी खूश नसायची. त्यामुळे आता मी विचारपूर्वक माझा जो़डीदार निवडणार आहे." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: mother of 12 children wants to remarry searching for man with 10 children told reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.