पाच मुलांच्या आईचं 5 मुलं असलेल्या प्रियकरासोबत लॅव्ह मॅरेज, घर सोडून जात होती तर रडू लागली मुलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 03:24 PM2022-09-19T15:24:18+5:302022-09-19T15:26:44+5:30

जेव्हा महिला आपल्या पाच मुलांना अलवर बाल संरक्षण आरोगाच्या सदस्याकडे सोडून प्रियकरासोबत जाऊ लागली तेव्हा मुलं तिला बिलगून रडू लागले आणि तिच्या मागे धावू लागले होते.

Mother of five children love marriage with father of 5 kids they start crying before leaving | पाच मुलांच्या आईचं 5 मुलं असलेल्या प्रियकरासोबत लॅव्ह मॅरेज, घर सोडून जात होती तर रडू लागली मुलं

पाच मुलांच्या आईचं 5 मुलं असलेल्या प्रियकरासोबत लॅव्ह मॅरेज, घर सोडून जात होती तर रडू लागली मुलं

Next

Weird Love Story: प्रेम किती आंधळं असतं याचं उदाहरण अलवर जिल्ह्यात बघायला मिळालं. इथे एका महिलेने पती आणि पाच मुलांना सोडून आपल्या प्रियकरासोबत लग्न केलं. हेच महिलेच्या प्रियकराने केलं. त्याने त्याच्या पाच मुलांना, आई-वडिलांना आणि पत्नीला सोडलं. दोघांनी लग्न केलं. हरयाणाच्या एका महिलेने लग्नाच्या 15 वर्षांनंतर आपल्या पाच मुलांना सोडून अलवरमध्ये राहणाऱ्या आपल्या प्रियकरासोबत निकाह केला. प्रियकर विवाहित आहे आणि त्यालाही पाच मुलं आहेत. जेव्हा महिला आपल्या पाच मुलांना अलवर बाल संरक्षण आरोगाच्या सदस्याकडे सोडून प्रियकरासोबत जाऊ लागली तेव्हा मुलं तिला बिलगून रडू लागले आणि तिच्या मागे धावू लागले होते.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गुरूवारी रात्री नूरजहां आणि मौसम खां जयपूरच्या हायकोर्टच्या माध्यमातून प्रोटेक्शन घेऊन अलवरला आले होते. नूरजहां म्हणाली की, तिने 3 महिन्यांआधी जयपूरमध्ये मौसम खांसोबत तिच्या मर्जीने निकाह केला. आता तिला 4 मुलांना बाल संरक्षण समितीकडे सोपवून जायचं आहे. एक मुलगा हरयाणामध्येच मजुरी करतो. पोलिसांनी नूरजहांला समजावण्याचा प्रयत्न केला. आधी तर ती मुलांना सोबत ठेवण्यासाठी तयार झाली, पण नंतर तिने नकार दिला. पोलीस शुक्रवारी सर्व मुलांना घेऊन अलवर बाल कल्याण समितीमध्ये आले. इथे कायदेशीर कारवाई करून मुलांना ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर नूरजहां आणि मौसम निघून गेले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हरयाणाच्या खोहरी गावात राहणाऱ्या नूरजगांचं लग्न 15 वर्षाआधी अलवरमधील तैयबसोबत झालं होतं. नूरजहां म्हणाली की, तैयब ट्रक ड्रायव्हर आहे. तो घरी आणि जातो. ना तो तिची काळजी घेत ना मुलांची. रोज दारू पितो. अशी अनेक वर्ष तिने सहन केली. नंतर ती मुलांना घेऊन माहेरी गेली. 

नूरजहांचा प्रियकर मौसम अलवर जवळच्या तूलेडा गावात राहणारा आहे. त्यांची नातेवाईकाच्या माध्यमातून भेट झाली. मौसमची पत्नी आणि पाच मुलं तूलेडामध्ये राहतात. तर मौसम मजुरीसाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरतो. दोघांमध्ये प्रेम झालं आणि दोघांनीही मुलांना सोडून निकाह केला.
मौसमने सांगितलं की, तो त्याच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देणार नाही. नूरजहांला तो आपल्या सोबत ठेवेल. जिथे तो मजुरी करेल तिथे ते राहतील. तो म्हणाला की, 3 महिन्याआधी त्याने जयपूरमध्ये नूरजहांसोबत निकाह केला. त्यानंतर दोघेही तिच्या माहेरी राहिले.  

बाल संरक्षण समितीने नूरजहांला मुलांना सोबत ठेवण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला. पण ती यासाठी तयार झाली नाही. नूरजहांने दोन मुलींना बालिका आवासमध्ये पाठवलं. दोन मुलांना अलवरमध्ये बाल आवासमध्ये ठेवलं. समितीने मुलांची कस्टडी घेतली आहे. 11 वर्षीय सुनैना सहाव्या वर्गात शिकते. सुनैना म्हणाली की, तिला माहीत आहे की, आई मौसमसोबत राहणार. आमचं आता काय होईल माहीत नाही. आम्हाला आईसोबत रहायचं आहे.
 

Web Title: Mother of five children love marriage with father of 5 kids they start crying before leaving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.