बोंबला; मुलगी राहिली बाजूला अन् जावयासोबत सासूच पळून गेली राव!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 05:51 PM2020-01-20T17:51:30+5:302020-01-20T17:55:42+5:30

लंडनच्या ट्विकेनहम या ठिकाणी राहत असलेल्या ३४ वर्षीय  लॉरेन हॉल आपल्या लग्नाने खूप खूश होती.

Mother stole daughters husband and had baby with him after footing bill for their dream | बोंबला; मुलगी राहिली बाजूला अन् जावयासोबत सासूच पळून गेली राव!

बोंबला; मुलगी राहिली बाजूला अन् जावयासोबत सासूच पळून गेली राव!

googlenewsNext

(image credit- distractify)

लंडनच्या ट्विकेनहम या ठिकाणी राहत असलेल्या ३४ वर्षीय  लॉरेन हॉल आपल्या लग्नाने खूप खूश होती. त्यामुळे ती आपल्या हनीमुनला आईला सुद्धा घेऊन गेली.  पण नंतर तिच्या लक्षात आलं की हनीमुनसाठी आईला घेऊन जाणं ही तीच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चुक होती. कारण त्यावेळी  लॉरेनची आई आणि लॉरेनचा पती आपसात खूप बोलत असायचे. पण तीला या गोष्टींची कल्पना सुद्धा नव्हती  की तिला तिची आई धोका देणार आहे. तीच्या आईने तिला आपल्या पतीपासून दूर केले.

माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार  लॉरेन ने सांगितले कि ती लग्नाच्या आधीपासून आपला पती पॉल व्हाईट या सोबत राहत होती. इतकेच नाही तर त्यांना एक मुलगा  सुद्धा होता. त्यानंतर २००४ मध्ये तिचं वय १९  झाल्यानंतर तीने आपल्या पार्टनर सोबत लग्न केलं. या लग्नात तिची आई ज्युली या महिलेने  जवळपास १४ लाख रूपये खर्च  केला. त्यानंतर पॉल त्यांना सोडून निघून गेला. 

लॉरेनला नंतर कळलं कि पॉल तिला सोडून तिची आई ज्यूली यांच्या सोबत राहत आहे. हे कळल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली . २००५ मध्ये अशी घटना घडली  ती ऐकून तुम्ही हैराण व्हाल लॉरेची आई ज्युली यांना एका मुलाला जन्म दिला त्याचे वडील पॉल  होते.

असं झाल्यानंतर लॉरेनला खूप धक्का बसला. कारण ती ज्या लोकांना आपलं समजत होती. त्याच लोकांनी तिला दुखावले होते. आता त्यांच्या लग्नाला १३ वर्ष पूर्ण झाली आहेत. अजून सुद्धा वेदना तशाच आहेत. माध्यामांनी दिलेल्या माहीतीनुसार आत्तासुद्धा लॉरेनची आई पॉल सोबत राहत आहे. ती आता चौथ्या मुलाला जन्म देणार आहे.

Web Title: Mother stole daughters husband and had baby with him after footing bill for their dream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.